देशाला मोठं यश मिळवायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'फोर-एस' मंत्र दिला आहे. NDTV चे एडिटर-इन-चीफ संजय पुगलिया यांनी घेतलेल्या खास मुलाखतीत मोदींनी "स्कोप" पासून सुरू करत फोर एस काय आहे हे सांगितले आहे. मोदी म्हणाले की एक तर स्कोप खुप मोठा असला पाहीजे. तो कधीच तुकड्या तुकड्यामध्ये असू नये. दुसरा एस म्हणजे स्केल. स्केलही खुप मोठ्या प्रमाणात असलं पाहीजे. या दोघां प्रमाणेच स्पिडही असणे गरजेचे आहे. त्यामुळे स्कोप, स्केल आणि स्पीड बरोबरच स्किल ही असले पाहीजे. या चार गोष्टी जर एकत्र केल्या तर आपण खुप काही साध्य करू शकतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली भाजपला आपल्या हिमतीवर बहुमत मिळवून दिले होते. 2014 साली भाजपला 282 जागांवर विजय मिळाला होता. तर एनडीएला 336 जागांसह बहुमत मिळालं होतं. विशेष म्हणजे 1984 नंतर देशात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. त्यानंतर झालेल्या 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने चांगले प्रदर्शन करत 303 जागांवर विजयी मिळवला. 2014 पेक्षा जास्त जागा भाजपला जिंकता आल्या. तर एनडीएच्या पदरात 353 जागा पडल्या होत्या. आता तिसऱ्यांदा पंतप्रधा नरेंद्र मोदी सार्वत्रिक निवडणुकीला समोरे जात आहेत. आता यावेळी मोदींनी भाजपसाठी 370 पारचे लक्ष ठेवले आहे. तर एनडीए 400 पारचे लक्ष आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही मुलाखत आतापर्यंतची सर्वात वेगळा आणि व्यापक आहे. शिवाय भविष्यातील भारताची झलकही यातून दिसेल. अर्थव्यवस्था, राजकारण, ग्लोबल पासून लोकलपर्यंत प्रत्येक मुद्द्यावर विचारलेल्या बेधडक प्रश्नाना पंतप्रधान मोदींनी तितकीच बेधडक उत्तर दिली आहेत.