मतदान केंद्राबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, मुंबईतील घटनेने हळहळ

मनोहर नलगे असं या 62 वर्षीय कार्यकर्त्याचं नाव आहे. डिलाईल रोड येथील बीडीडी चाळ क्रमांक 20 च्या येथे म्हस्कर उद्यानात ठाकरे गटाचा पोलिंग बूथ होता. तेथेच मनोहर नलगे हे देखील उपस्थित होते.  

जाहिरात
Read Time: 2 mins

देवेंद्र कोल्हटकर, मुंबई

मुंबईतील सर्व सहा लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडलं. मतदानादरम्यान एक दु:खद घटना वरळीतून समोर आली आहे. ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्याचा उन्हाचा त्रास झाल्याने मृत्यू झाल्याची घटना वरळी विधानसभा मतदारसंघात घडली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मनोहर नलगे असं या 62 वर्षीय कार्यकर्त्याचं नाव आहे. मतदारसंघातील मतदान केंद्रांबाहेर प्रत्येक पक्षांनी आपले पोलिंग बूथ उभारले होते. यापैकी डिलाईल रोड येथील बीडीडी चाळ क्रमांक 20 च्या येथे म्हसकर उद्यानात ठाकरे गटाचा पोलिंग बूथ होता. तेथेच मनोहर नलगे हे देखील उपस्थित होते. 

(नक्की वाचा - 50 हजार खर्च, 1900 किमीचा प्रवास; दुबईहून आलेल्या मतदाराच्या पदरी पडली निराशा)

मुंबईतील वाढत्या उन्हामुळे मनोहर नलगे यांना जीव गमवावा लागला आहे. उन्हामुळे आणि प्रचंड उकाड्यामुळे मनोहर यांना त्रास होऊ लागला. त्या ठिकाणी उपस्थितांना देखील त्यांनी हे सांगितलं. मात्र काही वेळातच त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. मनोहर यांना तातडीने तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी केईएम रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांना त्यांना मृत घोषित केलं आहे. 

(नक्की वाचा- कल्याण लोकसभा मतदारसंघातील 50 हजार नावं गायब? डोंबिवलीकर मागणार उच्च न्यायालयात दाद)

मुंबईतील 6 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी 

  • मुंबई उत्तर - 46.91 %
  • मुंबई उत्तर पश्चिम - 49.79 %
  • मुंबई उत्तर पूर्व - 48.67 % 
  • मुंबई उत्तर मध्य - 47.46 %
  • मुंबई दक्षिण मध्य - 48.80 %
  • मुंबई दक्षिण - 44.63 %