Thane News शिंदेंच्या ठाण्यात भाजपाचा 'मास्टरस्ट्रोक'; 40 उमेदवारांच्या यादीत 5 मुस्लीम चेहरे, वाचा सर्व नावं

Thane News : भारतीय जनता पार्टीनं ठाणे महापालिका निवडणुकीत 4 मुस्लीम उमेदवारांना संधी दिली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
ठाणे:

रिझवान शेख, प्रतिनिधी 

Thane News : मुंबईला लागून असलेल्या आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे शहरात यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपल्या 40 उमेदवारांची यादी जाहीर केली असून महायुतीमधील जागावाटपाचे चित्रही आता स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे भाजपानं ठाणे महापालिकेत 5 मुस्लीम उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. 

ठाणे महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजपा यांची युती असून, या युतीमध्ये शिवसेना मोठा भाऊ म्हणून मैदानात उतरणार आहे. एकूण जागांपैकी शिवसेना 87 जागांवर निवडणूक लढवणार आहे, तर भाजपाने आपल्या वाट्याला आलेल्या 40 जागांसाठी उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालांकडे लागले आहे.

महायुतीमधील जागावाटपाचे समीकरण

ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे, त्यातच एकनाथ शिंदे यांचे हे स्वतःचे शहर असल्याने शिवसेनेने येथे अधिक जागांवर आपला दावा कायम ठेवला होता. त्यानुसार शिवसेनेला 87 जागा मिळाल्या आहेत, तर भाजपाने 40 जागांवर समाधान मानले आहे. भाजपाने जाहीर केलेल्या यादीत सर्वसमावेशकतेवर भर दिला असून ओबीसी, एससी, एसटी आणि अल्पसंख्याक उमेदवारांनाही प्रतिनिधित्व दिले आहे. यामध्ये सिद्दीकी जमीर अहमद, जाकीर हुसेन आणि सोहेल हबीच सय्यद यांसारख्या नावांचा समावेश असल्याने भाजपाने सर्व स्तरांतील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे.

( नक्की वाचा : Thane Municipal Election ठाण्यात शिवसेना-भाजप युती, मनसेच्या 28 उमेदवारांची घोषणा; पाहा तुमच्या प्रभागात कोण? )


भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेली 40 उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे आहेत

1. अनिता राम डाकूर (प्रभाग 1, ओबीसी महिला)
2. कमल रमेश चौधरी (प्रभाग 2, एसटी महिला)
3. विकास पाटील (प्रभाग 3, ओबीसी)
4. अर्थना किरपा मनेरा (प्रभाग 2क, सर्वसाधारण महिला)
5. मनोहर जयसिंग डुंबरे (प्रभाग 5, सर्वसाधारण)
6. मुकेश मधुकर मोकाशी (प्रभाग 6, ओबीसी)
7. कोहा रमेश आई (प्रभाग 7, सर्वसाधारण महिला)
8. बामा देवी बीर बहादूर सिंह (प्रभाग 4क, सर्वसाधारण महिला)
9. प्रभाग क्रमांक 9 (सर्वसाधारण महिला - नाव जाहीर होणे बाकी)
10. सीताराम बाजी राजे (प्रभाग 10, सर्वसाधारण)
11. वैभव कदम (प्रभाग 11, सर्वसाधारण)
12. विनया विक्रम भोईर (प्रभाग 12, सर्वसाधारण महिला)
13. दिलीप काळे (प्रभाग 13, सर्वसाधारण)
14. सिद्दीकी जमीर अहमद (प्रभाग 14, सर्वसाधारण)
15. दीपक काशिनाथ जाधव (प्रभाग 15, ओबीसी)
16. सुचिता मिलिंद पाटणकर (प्रभाग 16, सर्वसाधारण महिला)
17. नंदा कृष्ण पाटील (प्रभाग 17, सर्वसाधारण महिला)
18. कृष्ण दादू पाटील (प्रभाग 18, सर्वसाधारण)
19. नारायण शंकर पवार (प्रभाग 19, ओबीसी)
20. माधुरी मेटांगे (प्रभाग 20, सर्वसाधारण महिला)
21. काजोल गुणीजन (प्रभाग 21, सर्वसाधारण)
22. सुरेश चंटू कांबळे (प्रभाग 22, एससी)
23. अनिता दयार्थकर यादव (प्रभाग 23, सर्वसाधारण महिला)
24. अमित जयसिंग सरेपा (प्रभाग 24, सर्वसाधारण)
25. भारत अभिमन्यू चव्हाण (प्रभाग 25, सर्वसाधारण)
26. संजय संतू वाघुले (प्रभाग 26, ओबीसी)
27. मृणाल अरविंद पेंडसे (प्रभाग 27, सर्वसाधारण महिला)
28. प्रतिभा राजेश मध्यी (प्रभाग 28, सर्वसाधारण महिला)
29. सुनेश जोशी (प्रभाग 29, सर्वसाधारण)
30. उषा विशाल वाप (प्रभाग 30, एससी महिला)
31. नम्रता जयेंद्र कोळी (प्रभाग 31, सर्वसाधारण महिला)
32. दीनानाथ पांडे (प्रभाग 32, सर्वसाधारण)
33. अनुसमा अनिल भगत (प्रभाग 33, सर्वसाधारण महिला)
34. कल्पना सुनील सुर्यबंधी (प्रभाग 34, सर्वसाधारण)
35. वेदिका नरेश पाटील (प्रभाग 35, सर्वसाधारण महिला)
36. जाकीर हुसेन (प्रभाग 36, ओबीसी)
37. सुजित गुप्ता (प्रभाग 37, सर्वसाधारण)
38. नाझिया तांबोळी (प्रभाग 38, सर्वसाधारण महिला)
39. अभिया जायेद रोख (प्रभाग 39, सर्वसाधारण महिला)
40. सोहेल हबीच सय्यद (प्रभाग 40, सर्वसाधारण)

Advertisement

चुरशीची लढत आणि राजकीय समीकरणे

ठाणे महापालिकेत सत्ता टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. दुसरीकडे, भाजपाने आपल्या वाट्याला आलेल्या जागांवर निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार दिले आहेत. या यादीमध्ये अनेक माजी नगरसेवकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे, तर काही ठिकाणी नवीन चेहऱ्यांना वाव मिळाला आहे. विशेषतः प्रभाग 5 मधील मनोहर डुंबरे आणि प्रभाग 26 मधील संजय वाघुले यांची उमेदवारी महत्त्वाची मानली जात आहे. आगामी काळात ही निवडणूक कोण जिंकणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.