TMC Election 2026 : Voter ID नाही? काळजी नको, 'या' 12 पुराव्यांच्या आधारे ठाणेकर करू शकणार मतदान!

Thane Municipal Election 2026: या निवडणुकीत मतदारांची ओळख पटवण्यासाठी निवडणूक आयोगाने महत्त्वाची नियमावली जाहीर केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Thane Municipal Election 2026: ठाणे महानगरपालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे.
ठाणे:

Thane Municipal Election 2026: ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाची तारीख आता जवळ आली आहे. 15 जानेवारी 2026 रोजी ठाणेकर आपल्या शहराचा नवा कारभारी निवडण्यासाठी मतदान करणार आहेत. या निवडणुकीत मतदारांची ओळख पटवण्यासाठी निवडणूक आयोगाने महत्त्वाची नियमावली जाहीर केली असून मतदानासाठी केवळ निवडणूक ओळखपत्रच हवे असे नाही, तर इतर 12 प्रकारचे पुरावे देखील ग्राह्य धरले जाणार आहेत. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

निवडणूक ओळखपत्र नसल्यास काय करावे?

अनेकदा मतदारांकडे निवडणूक आयोगाचे अधिकृत छायाचित्र ओळखपत्र उपलब्ध नसते. अशा वेळी मतदान करता येईल की नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र यावेळच्या निवडणुकीत मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी आयोगाने पर्यायी पुराव्यांची मोठी यादी दिली आहे.

ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत आहे, पण त्यांच्याकडे निवडणूक ओळखपत्र नाही, त्यांना राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेले 12 पैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

( नक्की वाचा : ZP Election 2026 : जिल्हा परिषद निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू;48 तासांमध्ये मोठी घोषणा? वाचा काय आहे कोर्टाचा आदेश )

12 पुरावे कोणते?

मतदानासाठी जे 12 पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत, त्यामध्ये आधार कार्ड हा सर्वात महत्त्वाचा पुरावा आहे. याशिवाय

  • मनरेगा अंतर्गत मिळालेले ओळखपत्र
  • पासपोर्ट
  • वाहनचालक परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसेन्स 
  • केंद्र किंवा राज्य शासनाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी दिलेले फोटो ओळखपत्र
  • बँक किंवा पोस्ट ऑफिसने दिलेले फोटोसह पासबुक
  • पॅनकार्ड
  • स्वातंत्र्य सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र 
  • मनरेगा जॉबकार्ड 
  • कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड
  • छायाचित्र असलेली पेन्शनची कागदपत्रे
  • खासदार किंवा आमदारांना दिलेली अधिकृत ओळखपत्रे
  •  सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला अपंगत्वाचा दाखला. हे सर्व पुरावे मतदानासाठी वैध मानले जातील.

( नक्की वाचा : Jitendra Awhad : 'झुटा जितेंदर, तुतारीची मुतारी'23 वर्ष जुना सहकारी युनस शेख आव्हाडांवर भर सभेत घसरला, VIDEO )

केवळ व्होटर स्लीप पुरेशी नाही

मतदान केंद्रावर जाताना एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे की, केवळ निवडणूक आयोगाची व्होटर स्लीप दाखवून मतदान करता येणार नाही. वोटर स्लीपसोबत वरील 12 पुराव्यांपैकी एक मूळ ओळखपत्र जवळ असणे अनिवार्य आहे. जर एखाद्या मतदाराने आपला पत्ता बदलला असेल आणि त्याला अद्याप नवीन ओळखपत्र मिळाले नसेल, तर त्याचे जुने ओळखपत्र देखील ग्राह्य धरले जाईल. मात्र, अशा मतदाराचे नाव सध्याच्या पत्त्यासह मतदार यादीत असणे गरजेचे आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article