जाहिरात

Jitendra Awhad : 'झुटा जितेंदर, तुतारीची मुतारी'23 वर्ष जुना सहकारी युनस शेख आव्हाडांवर भर सभेत घसरला, VIDEO

Thane Municipal Corporation Election 2026: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला असलेल्या मुंब्र्यात त्यांना आता त्यांच्याच जुन्या सहकाऱ्याने थेट आव्हान दिले आहे. 

Jitendra Awhad : 'झुटा जितेंदर, तुतारीची मुतारी'23 वर्ष जुना सहकारी युनस शेख आव्हाडांवर भर सभेत घसरला, VIDEO
TMC Election 2026 : जितेंद्र आव्हाड यांना मुंब्र्यातूनच मोठं आव्हान मिळालंय.
मुंबई:

सागर जोशी, प्रतिनिधी

Thane Municipal Corporation Election 2026: ठाणे महापालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय. या निवडणूक प्रचारात  मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील राजकारण  कमालीचे तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला असलेल्या मुंब्र्यात त्यांना आता त्यांच्याच जुन्या सहकाऱ्याने थेट आव्हान दिले आहे. 

कधीकाळी आव्हाडांचे खंदे समर्थक मानले जाणारे युनुस शेख यांनी आता एमआयएममध्ये प्रवेश केला असून, त्यांनी आव्हाडांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्ला चढवला आहे. या वादामुळे मुंब्र्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

काय आहे कारण?

युनुस शेख आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील वादाचे मुख्य कारण तिकीट वाटप असल्याचे समोर आले आहे. युनुस शेख यांनी त्यांची मुलगी शहर शेख हिच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून महापालिकेचे तिकीट मागितले होते. मात्र, आव्हाडांनी तिला तिकीट नाकारल्याचा आरोप शेख यांनी केला आहे.

 यामुळे नाराज झालेल्या शेख यांनी एमआयएमची वाट धरली आणि आता ते आव्हाडांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिले आहेत. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत त्यांनी आव्हाडांवर शेलक्या शब्दांत टीका केली.

( नक्की वाचा : Ambernath Election : अंबरनाथच्या उपनगराध्यक्षपद निवडणुकीत भाजपा बोल्ड! शिवसेनेच्या फिल्डिंगवर NCP चा सिक्सर! )

जुन्या मैत्रीत मिठाचा खडा

जितेंद्र आव्हाड आणि युनुस शेख यांचे नाते 23 वर्षांपासूनचे होते. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्यात कुरबुरी सुरू होत्या. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी वचननामा प्रकाशनाच्या कार्यक्रमात युनुस शेख यांचा फोटो लावला नव्हता, तेव्हाही मोठा वाद झाला होता. त्या रागातून शेख यांनी भर सभेत आव्हाडांना सुनावले होते. आता तोच राग पुन्हा एकदा बाहेर आला असून शेख यांनी आव्हाडांना थेट ओपन चॅलेंज दिले आहे.

मुंब्र्यात एन्ट्री बंद करण्याचा इशारा

प्रचार सभेतील भाषणादरम्यान युनुस शेख यांचा पारा चढलेला पाहायला मिळाला. त्यांनी आव्हाडांना उद्देशून म्हटले की, मी तुझा 23 वर्षे जुना मित्र आहे, पण आजपासून तुला कोणीही जितेंद्र आव्हाड म्हणणार नाही, तुझे नाव आता झुटा जितेंदर असे आहे. 

इतकेच नाही तर, ज्या दिवशी माझे डोकं फिरेल त्या दिवशी तुझी मुंब्र्यात एन्ट्री बंद करून टाकेन, असा इशाराही त्यांनी दिला. तुमच्या घराचे नाव नाद आहे, पण आमचा नाद करू नका नाहीतर तुमच्या घरी येऊन पतंग उडवेन, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. शेख यांचं भाषण सोशल मीडियावर व्हायरल झालंय. 

( नक्की वाचा : ZP Election 2026 : जिल्हा परिषद निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू;48 तासांमध्ये मोठी घोषणा? वाचा काय आहे कोर्टाचा आदेश )

आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागणार का?

मुंब्रा हा भाग जितेंद्र आव्हाड यांचा अभेद्य गड मानला जातो. या मतदारसंघातून ते सातत्याने मोठ्या मताधिक्याने निवडून येत आहेत. मात्र, आता युनुस शेख यांच्यासारखे त्यांचेच जुने सहकारी विरोधात गेल्यामुळे आव्हाडांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. 

एमआयएमच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन करताना शेख यांनी शरद पवार गटाच्या चिन्हाचा उल्लेख करत अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. या सर्व टीकेवर जितेंद्र आव्हाड यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत मुंब्र्यातील मतदार कोणाच्या बाजूने उभे राहतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

इथे पाहा VIDEO

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com