Thane Municipal Election ठाण्यात शिवसेना-भाजप युती, मनसेच्या 28 उमेदवारांची घोषणा; पाहा तुमच्या प्रभागात कोण?

Thane Municipal Election 2026 : ठाणे महापालिका निवडणुकीत यंदा चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

जाहिरात
Read Time: 4 mins
Thane Municipal Election 2026 : ठाणे महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता.
ठाणे:

रिझवान शेख, प्रतिनिधी

Thane Municipal Election 2026 : ठाणे महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारी रोजी होत आहे. या महापालिकेच्या एकूण 131 जागांसाठी अर्ज भरण्याचा आज (मंगळवार, 30 डिसेंबर ) शेवटचा दिवस होता. या निवडणुकीत सत्तारुढ भाजपा आणि शिवसेना यांच्यातील युतीवर शिक्कामोर्तब झाले असून त्यांचे जागावाटपही निश्चित झाले आहे. या युतीमध्ये भाजपने 40 जागांवर तर शिवसेनेने 87 जागांवर निवडणूक लढवत आहे.

 दुसरीकडे, महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागावाटपाचा कोणताही अधिकृत आकडा समोर आलेला नाही. मात्र, काँग्रेसने ठाणे महापालिकेत स्वबळाचा नारा दिला असून त्यांनी सर्व 131 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटानेही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत 131 जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचे संकेत दिले आहेत.

राजकीय वर्तुळात चर्चा आणि बंडखोरीचे सावट

निवडणुकीच्या या धामधुमीत अनेक धक्कादायक निर्णय पाहायला मिळत आहेत. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाला या निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आले असून त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. तिकीट वाटप करताना काही जुन्या चेहऱ्यांना डच्चू देण्यात आला असून नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न पक्षांकडून होताना दिसत आहे. 

प्रभाग क्रमांक 6 मधून उषा डोंगरे यांचा पत्ता कट झाला असून त्यांच्या जागी नव्या नावांचा विचार झाला आहे. तसेच प्रभाग क्रमांक 15 मधून एकनाथ भोईर यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे. सुनील हांडोरे यांचे तिकीट कापून त्यांच्या जागी भाजपच्या उषा वाघ यांना संधी देण्यात आली आहे.

( नक्की वाचा : Thane News : ठाण्यात खळबळ! प्रताप सरनाईकांच्या मुलाची निवडणुकीतून माघार; पत्रात लिहिलं माघार घेण्याचं मोठं कारण )
 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 28 अधिकृत उमेदवारांची यादी

मनसेने ठाण्यात आपली ताकद दाखवण्यासाठी 28 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये खालील नावांचा समावेश आहे:

प्रभाग क्र. 3 (क) श्री. निलेश चव्हाण
प्रभाग क्र. 2 (ड) श्री. रविंद्र मोरे
प्रभाग क्र. 4 (अ) प्रतिक्षा हरेश्वर डाकी
प्रभाग क्र. 5 (ड) श्री. पुष्पराज विचारे
प्रभाग क्र. 20 (ब) सौ. सविता चव्हाण
प्रभाग क्र. 20 (क) सौ. राजश्री नाईक
प्रभाग क्र. 14 (अ) सौ. रेश्मा चौधरी
प्रभाग क्र. 19 (ब) सौ. प्रमिला मोरे
प्रभाग क्र. 16 (ब) सौ. आरती पाटील
प्रभाग क्र. 8 (ड) श्री. सचिन कुरेल
प्रभाग क्र. 15 (अ) श्री. पवनकुमार पडवळ
प्रभाग क्र. 16 (क) सौ. रश्मी सावंत
प्रभाग क्र. 7 (ब) सौ. स्वप्नाली खामकर - पाचंगे
प्रभाग क्र. 21 (ब) सौ. संजीता जोशी
प्रभाग क्र. 21 (क) सौ. उर्मिला डोंगरे
प्रभाग क्र. 11 (क) सौ. सीमा इंगळे
प्रभाग क्र. 17 (ब) सौ. पूजा ढमाळ
प्रभाग क्र. 12 (ब) सौ. रक्षा मांडवकर
प्रभाग क्र. 12 (अ) श्री. रूपेश जाधव
प्रभाग क्र. 18 (क) सौ. प्राची घाडगे
प्रभाग क्र. 22 (ब) श्री. रविंद्र सोनार
प्रभाग क्र. 22 (अ) सौ. प्रज्ञा कांबळे
प्रभाग क्रमांक 27 (अ) प्रकाश दत्ता पाटील
प्रभाग क्रमांक 27 (ब) नीता देवेंद्र भगत
प्रभाग क्रमांक 27 (क) मयूरी तेजस पोरजी
प्रभाग क्रमांक 27 (ड) प्रशांत प्रभाकर गावडे
प्रभाग क्रमांक 28 (ब) रेश्मा नरेश पवार
प्रभाग क्रमांक 28 (क) अंकिता अनंत कदम

Advertisement

( नक्की वाचा : BMC Election 2026: मनसेचे 'मिशन मुंबई'; 53 जणांना उमेदवारी जाहीर, वाचा कुणाला मिळाली संधी? )
 

शिवसेना (एकनाथ शिंदे गट) एबी फॉर्म मिळालेल्या उमेदवारांची यादी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपल्या अनेक विश्वासू कार्यकर्त्यांना आणि आजी-माजी नगरसेवकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. ज्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत, त्यांची प्रभागनिहाय यादी खालीलप्रमाणे आहे:

प्रभाग क्रमांक 03: विक्रांत वायचळ, मीनाक्षी शिंदे, पद्मा भगत, लव पाटील
प्रभाग क्रमांक 06: ढमाले, कांचन चिंदरकर, दिलीप बारटक्के, राकेश शिंदे
प्रभाग क्रमांक 17: प्रकाश शिंदे, संध्या मोरे, योगेश जानकर, गुरुमुख सिंह (पत्नीला तिकीट), शैलेश शिंदे, मनोज शिंदे, एकता एकनाथ भोईर
प्रभाग क्रमांक 18: राम रेपाळे, जयश्री फाटक, दीपक वेतकर, सुखदा मोरे
प्रभाग क्रमांक 19: मीनल संखे, विकास रेपाळे, नम्रता भोसले जाधव, राजेंद्र फाटक
प्रभाग क्रमांक 08: देवराम भोईर, उषा भोईर, संजय भोईर, सपना भोईर
प्रभाग क्रमांक 13: निर्मला कणसे, अशोक वैती, अनिल भोर, वर्षा
प्रभाग क्रमांक 22: सुधीर कोकाटे, पवन कदम, उषा विशाल वाघ (भाजप)
प्रभाग क्रमांक 07: राजू फाटक, विमल भोईर, कल्पना पाटील, कदम
प्रभाग क्रमांक 11: दीपक जाधव
प्रभाग क्रमांक 02: मनोहर डुंबरे, विकास पाटील, कमल चौधरी, अर्चना मणेरा
प्रभाग क्रमांक 06: हनुमंत जगदाळे, राजा जाधवन, सरिता दिगंबर ठाकूर, वनिता संदीप घोगरे
प्रभाग क्रमांक 01: अनिता राम ठाकूर, नम्रता घरात, सिद्धार्थ ओलेकर, प्रमिला गावित
प्रभाग क्रमांक 25: मिलिंद पाटील, मनाली पाटील, प्रमिला केनी
प्रभाग क्रमांक 09: विजया लासे, अनिता गौरी, गणेश कांबळे, उमेश पाटील
प्रभाग क्रमांक 23: प्रियांका पाटील, आरती गायकवाड, जितेंद्र पाटील, संतोष तोडकर
प्रभाग क्रमांक 28: रमाकांत मढवी, शैलेश पाटील
प्रभाग क्रमांक 27: शैलेश पाटील, आदेश भगत, दीपाली भगत, स्नेहा अमर पाटील

Advertisement

( नक्की वाचा : Mira Bhayandar मुलीला उमेदवारी नाही, आईला हार्ट अटॅक; भाजपमधील वादाला मिरा भाईंदरमध्ये भावनिक वळण )

या उमेदवारांच्या घोषणांमुळे ठाणे महापालिकेच्या राजकारणात आता खऱ्या अर्थाने रंगत येणार आहे. सर्वच पक्षांनी आपापली ताकद पणाला लावली असून मतदारांचा कौल कोणाकडे जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Topics mentioned in this article