BMC Election 2026 MNS Candidate List: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा मंगळवार (30 डिसेंबर ) हा शेवटचा दिवस होता. या निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 53 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे.
विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर मनसेसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यावेळेस राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून राज ठाकरे यांनी त्यांचे चुलत भाऊ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी युती केल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.
राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर तब्बल 20 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच युतीत एकत्र आले आहेत. या ऐतिहासिक पुनर्मिलनामुळे संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई महापालिका निवडणुकीकडे लागले आहे. मुंबईची सत्ता काबीज करण्यासाठी दोन्ही भावांनी एकत्र येण्याचा घेतलेला हा निर्णय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला असून, यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अधिक प्रतिष्ठेची झाली आहे.
( नक्की वाचा : Thane News ठाण्यात खळबळ! प्रताप सरनाईकांच्या मुलाची निवडणुकीतून माघार; पत्रात लिहिलं माघार घेण्याचं मोठं कारण )
मुंबई महानगरपालिकेसाठी मनसेच्या 53 उमेदवारांची संपूर्ण यादी
1. दहिसर (प्रभाग 8): कस्तुरी चंद्रकांत रोहेकर (खुला महिला)
2. दहिसर (प्रभाग 10): विजय पाटील (ओबीसी)
3. मागाठाणे (प्रभाग 11): कविता राजेंद्र माने (ओबीसी महिला)
4. बोरीवली (प्रभाग 14): पुजा कुणाल माईणकर (खुला महिला)
5. बोरीवली (प्रभाग 18): सदिच्छा कबिरदास मोरे (ओबीसी महिला)
6. चारकोप (प्रभाग 20): दिनेश साळवी (खुला)
7. चारकोप (प्रभाग 21): सोनाली देव मिश्रा (खुला महिला)
8. कांदिवली पुर्व (प्रभाग 23): किरण अशोक जाधव (खुला)
9. कांदिवली पुर्व (प्रभाग 27): आशा चांदर (ओबीसी महिला)
10. कांदिवली पुर्व (प्रभाग 36): प्रशांत महाडीक (खुला)
11. दिंडोशी (प्रभाग 38): सुरेखा लोके (खुला महिला)
12. मालाड पश्चिम (प्रभाग 46): स्नेहिता संदेश डेहलीकर (ओबीसी महिला)
13. गोरेगाव (प्रभाग 55): शैलेंद्र मोरे (खुला)
14. गोरेगाव (प्रभाग 58): विरेंद्र जाधव (खुला)
15. अंधेरी पश्चिम (प्रभाग 67): कुशल धुरी (खुला)
16. वर्सोवा (प्रभाग 68): संदेश देसाई (खुला)
17. जोगेश्वरी पुर्व (प्रभाग 74): विद्या भरत आर्य (खुला महिला)
18. विलेपार्ले (प्रभाग 84): रुपाली संदिप दळवी (खुला महिला)
19. विलेपार्ले (प्रभाग 85): चेतन श्रीधर बेलकर (ओबीसी)
20. वांद्रे पश्चिम (प्रभाग 98): दिप्ती काते (खुला)
21. वांद्रे पश्चिम (प्रभाग 102): आनंद हजारे (खुला)
22. मुलुंड (प्रभाग 103): दिप्ती राजेश पांचाळ (खुला महिला)
23. मुलुंड (प्रभाग 104): राजेश चव्हाण (खुला)
24. मुलुंड (प्रभाग 106): सत्यवान दळवी (खुला)
25. भांडुप पश्चिम (प्रभाग 110): हरिनाक्षी मोहन चिराथ (खुला महिला)
26. भांडुप पश्चिम (प्रभाग 115): ज्योती अनिल राजभोज (खुला महिला)
27. विक्रोळी (प्रभाग 119): विश्वजीत शंकर ढोलम (खुला)
28. घाटकोपर पश्चिम (प्रभाग 128): सई सनी शिर्के (ओबीसी महिला)
29. घाटकोपर पश्चिम (प्रभाग 129): विजया भिवा गिते (ओबीसी महिला)
30. घाटकोपर पुर्व (प्रभाग 133): भाग्यश्री अविनाश कदम (एस. सी. महिला)
31. मानखुर्द - शिवाजी नगर (प्रभाग 139): शिरोमणी येशु जगली (खुला महिला)
32. अणुशक्ति नगर (प्रभाग 143): प्रांजल प्रशांत राणे (खुला महिला)
33. अणुशक्ति नगर (प्रभाग 146): राजेश पुरभे (एस. सी.)
34. कुर्ला (प्रभाग 149): अविनाश मयेकर (खुला)
35. चेंबुर (प्रभाग 150): सविता थोरवे (ओबीसी महिला)
36. चेंबुर (प्रभाग 152): सुदांशु कर्णा दुनबळे (एस. सी.)
37. कलिना (प्रभाग 166): राजन मधुकर खैरनार (खुला)
38. सायन कोळीवाडा (प्रभाग 175): अर्चना दिपक कासले (खुला महिला)
39. वडाळा (प्रभाग 177): हेमाली परेश भनसाली (खुला महिला)
40. वडाळा (प्रभाग 178): बजरंग देशमुख (खुला)
41. धारावी (प्रभाग 183): पारुबाई कटके (एस. सी. महिला)
42. धारावी (प्रभाग 188): आरिफ शेख (खुला)
43. माहिम (प्रभाग 192): यशवंत मारुती किल्लेदार (खुला)
44. वरळी (प्रभाग 197): रचना साळवी (खुला महिला)
45. शिवडी (प्रभाग 205): सुप्रिया दिलीप दळवी (खुला महिला)
46. भायखळा (प्रभाग 207): शलाका हरियाण (खुला)
47. भायखळा (प्रभाग 209): हसीना माईंणकर (खुला महिला)
48. भायखळा (प्रभाग 212): श्रावणी विनय हळदणकर (खुला महिला)
49. मलबार हिल (प्रभाग 214): मुकेश भालेराव (खुला)
50. मुंबादेवी (प्रभाग 216): राजश्री दिलीप नागरे (ओबीसी महिला)
51. मलबार हिल (प्रभाग 217): निलेश शिरधनकर (खुला)
52. मुंबादेवी (प्रभाग 223): प्रशांत गांधी (ओबीसी)
53. कुलाबा (प्रभाग 226): बबन महाडीक (ओबीसी)
मनसेच्या यादीचे वैशिष्ट्य
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर केलेल्या या 53 उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये सर्वसमावेशकतेवर भर दिला आहे. या यादीमध्ये महिला उमेदवारांचे वर्चस्व स्पष्टपणे जाणवते. एकूण 53 उमेदवारांपैकी 29 महिलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे, तर 24 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. राज ठाकरे यांनी निम्म्याहून अधिक जागांवर महिलांना संधी देऊन एक मोठा राजकीय संदेश दिला आहे.
प्रवर्गनिहाय विचार केल्यास, खुल्या प्रवर्गातून (General Category) सर्वाधिक 36 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 20 महिला आणि 16 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गालाही (OBC) मनसेने यादीत महत्त्वाचे स्थान दिले आहे. एकूण 13 ओबीसी उमेदवारांना तिकीट मिळाले असून त्यामध्ये 7 महिला आणि 6 पुरुषांचा समावेश आहे.
तसेच, अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातून 4 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 2 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. अशा प्रकारे मुंबईतील विविध जाती आणि घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न या यादीतून करण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world