विधानपरिषदेसाठी ठाकरेंनी उमेदवारांची केली घोषणा, कोणाला उमेदवारी कोणाचा पत्ता कट?

मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदार संघासाठी ही निवडणूक होत आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी दोन जागांवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने उमेदवारांची घोषणा केली आहे. मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदार संघासाठी ही निवडणूक होत आहे. मुंबई पदवीधर मतदार संघातून विलास पोतनिस, मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील, नाशिक शिक्षकमधून किशोर दराडे आणि कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांची मुदत संपत आहे. त्यामुळे या ठिकाणी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

कोणाला उमेदवारी? 

मुंबई पदवीधर मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाने अनिल परब यांना उमेदवारी दिली आहे. अनिल परब हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. या विद्यमान आमदार विलास पोतनिस यांची उमेदवारी कापून परब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबई पदवीधर मतदार संघातून पोतनिस प्रतिनिधीत्व करत होते. त्यांच्या ऐवजी अनिल परब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबई पदवीधर मतदार संघावर अनेक वर्षापासून शिवसेना ठाकरे गटाचा दबदबा राहीला आहे. दरम्यान मुंबई शिक्षक मतदार संघातून  ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

हेही वाचा - Exclusive : 73 व्या वर्षी 22 वर्षांच्या तरुणासारखा उत्साह कसा? PM मोदींनी सांगितलं रहस्य

निवडणूक कधी होणार? 

या निवडणुकीची 31 मे ला अधिसुचना जारी करण्यात आली आहे. तर 7 जून पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 10 जूनला अर्जाची छाननी केली जाईल. 12 जून पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. मतदान 26 जूनला होणार असून 1 जुलैला मतमोजणी होणार आहे.

हेही वाचा -  लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, 7 राज्य 58 जागा

नाशिक कोकण कोणाच्या पारड्यात? 

राज्यात महाविकास आघाडी आहे. त्यात आता ठाकरेंनी दोन जागावरचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर आघाडीत कोणाच्या वाट्याला जाणार याबाबत उत्सुकता आहे. कोकण पदवीधरवर या आधीच काँग्रेसने दावा केला आहे. त्यामुळे नाशिक पवारांना मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.   

Advertisement