धाराशिव लोकसभेत राणा जगजितसिंह पाटील विरूद्ध ओमराजे यांचे वाकयुद्ध चांगलेच रंगले आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. या दोघांचे वैर संपूर्ण राज्याला माहित आहे. त्याता आता आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी एन्ट्री झाली आहे. त्यामुळे ओमराजेंवर आता दुतर्फा हल्ला सुरू झाला आहे. अशा वेळी ओमराजेंमधला शिवसैनिक जागा झाला आहे. त्यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हल्ल्याला जशाच तसे उत्तर देत राजकीय वातावरण आणखी तापवलं आहे. तानाजी सावंत यांच्यावर हल्लाबोल करताना, त्यांनी राणां आणि त्यांचे वडील पद्मसिह पाटील यांनाही डिवचलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा )
'तू किस झाड की पत्ती'
ठाकरे गटाचे धाराशिव लोकसभेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा जोरदार समाचार घेतला आहे. मी ४० वर्षे मंत्री राहिलेल्या डॉ.पद्मसिंह पाटील आणि राणा पाटलांना गार करून आलोय, तू किस झाड की पत्ती है अशा शब्दात ओमराजे निंबाळकर यांनी तानाजी सावंत यांना फटकारले आहे. ते म्हणतात मी गोल्ड मेडलिस्ट आहे. तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत. पण कुणा बद्दल काय बोलावं ऐवढी तरी अक्कल तुम्हाला दिली नाही का? तुमचे आई बाप तुमच्यावर संस्कार करायला विसरले का? या पुढे जर माझा वडीलाबद्दल काही बोललात तर हा ओमराजे सहन करणार नाही असा थेट इशाराच त्यांनी सावंत यांना दिला आहे.
हेही वाचा - 'दादांना खलनायक केलं' मुंडे पहिल्यांदाच बोलले, पडद्यामागे काय घडलं?
काय म्हणाले होते तानाजी सावंत
दोन दिवसांपूर्वी ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरात शिवसेनेच्या मेळाव्यात तानाजी सावंत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. सगळ्या सहकारी संस्थाची यांनी अन् याच्या बापाने वाट लावली. तेरणा बंद पाडला. भंगार विकल अन् खापर राणा दादांच्या वडिलांवर फोडलं. तुला लोकसभेत बसवण्यासाठी आम्ही जिवाचं रान केलं. या सावंत सरांनी तुझ्यासाठी या शेतकऱ्यांची कष्टाची साखर गोडावूनला होती ती 60 लाख क्विंटल विकली. असं म्हणत त्यांनी असंसदीय भाषेचाही उल्लेख केला होता. ही भंगार विकणाऱ्याची अवलाद असाही त्यांनी ओमराजेंचा उल्लेख केला होता.
धाराशिवमध्ये राणा विरूद्ध ओमराजे सामना
धाराशिव लोकसभेमध्ये ओमराजे निंबाळकर विरूद्ध अर्चना पाटील असा सामना रंगतोय. अर्चना पाटील जरी मैदानात असतील तरी खरी लढत ही ओमराजे विरूद्ध राणा जगजितसिंह पाटील अशीच आहे. ही जागा शिवसेना शिंदे गटाला हवी होती. पण ती राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळाली होती. तानाजी सावंत ही जागा शिवसेनेला मिळावी म्हणू आग्रही होते. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते काही वेळ नाराजही होते.