Parbhani Municipal Election 2026 : मुंबई महानगरपालिकेत ठाकरे गट आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. मात्र मुंबई महानगरपालिकेत भाजप ९१ आणि उद्धव ठाकरे ७१ जागांच्या आघाडीवर आहेत. शिंदेंच्या शिवसेनेला येथे ३० जागांवर (कल) समाधान मानावे लागले. ठाण्यातही ठाकरेंच्या बाबतीत असंच काहीसं चित्र आहे. ठाणे महानगरपालिकेत शिवसेना शिंदे गट ३४, भाजप २४ जागा आणि उद्धव ठाकरे सेना ७ जागांवर आघाडीवर आहे.
ठाण्यात ठाकरेंना मोठा धक्का सहन करावा लागला. पुण्यात तर ठाकरेंना भोपळाही फोडता आला नाही. पुण्यात भाजप ८०, अजित पवार गट ६, काँग्रेस ३, शरद पवार गट ३ जागांवर आघाडीवर आहे. पुणेकर भाजपच्या पाठीशी उभं असल्याचं चित्र आहे. यासर्व अपयशात केवळ एकाच महानगरपालिकेत ठाकरे ब्रँडची जादू चालल्याचं दिसून येत आहे.
परभणी महानगरपालिकेत ठाकरेंची जादू
इतर २८ महानगरपालिकेत ठाकरे गटाला फारसं यश मिळवता आलं नाही. २९ महानगरपालिकेपैकी केवळ एकाच पालिकेत ठाकरे गट पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे महापौरदेखील याच पक्षाचा असेल.
परभणीत महानगरपालिकेत कोणाला किती जागा?
शिवसेना ठाकरे गट - २५
भाजप - १२
काँग्रेस - १२
अजित पवार गट - ११
एमआयएम - ०
वंचित - ०
शिवसेना - ०
शरद पवार गट - ०
इतर - ५