'रोलर कोस्टर' सारख्या लढतीत वर्षा गायकवाड यांची बाजी, अखेरच्या टप्प्यात मोठा ट्विस्ट

मतमोजणीच्या दिवशी मोठा चढ-उतार येथे पाहायला मिळाला. अखेर अटीतटीच्या लढतीत महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचा पराभव केला. 

Advertisement
Read Time: 2 mins

अभिषेक मुठाळ, मुंबई

मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुरुवातीपासूनच चुरशीची बनली. मतमोजणीच्या दिवशी मोठा चढ-उतार येथे पाहायला मिळाला. अखेर अटीतटीच्या लढतीत महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचा पराभव केला. 

वर्षा गायकवाड या जवळपास 3 हजार मतांनी विजयी झाल्या आहेत. एकवेळ अशी होती की उज्जल निकम यांची आघाडी जवळपास 60 हजारांच्या वर गेली होती. मात्र शेवटच्या टप्प्यात उज्वल निकम यांना मागे टाकत वर्षा गायकवाड यांनी आघाडी घेतली. अखेर वर्षा गायकवाड यांनी विजय प्रस्थापित केला. 

(नक्की वाचा- उत्तर महाराष्ट्रात वारं फिरलं! महाविकास आघाडीची मोठी मुसंडी)

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात 51.98 टक्के मतदानाची नोंद झाली होती.  मराठी मतदारांबरोबरच दलित आणि उत्तर भारतीय मतदारांची मोठी संख्या या मतदारसंघात आहे. मुस्लिम मतदारही या मतदार संघात आहेत. याचाच फायदा वर्षा गायकवाड यांना झाल्याचं दिसून येतंय. 

संविधान टिकले पाहीजे यासाठी मतदान करा हा प्रमुख मुद्दा वर्षा गायकवाड यांनी आपल्या प्रचारात घेतला होता. तर या मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या पाहात हिंदू-मुस्लीम करण्याचा प्रयत्नही मतदारसंघात झाला होता.

Advertisement

(नक्की वाचा - Lok Sabha Election Result 2024 : राज ठाकरेंची जादू चालली?; महायुतीला या मतदारसंघांमध्ये मोठा फायदा)

विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा तिकीट कापून उज्वल निकम यांच्यावर भाजपने विश्वास दाखवला होता. उज्वल निकम यांचा पराभव भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण आशिष शेलार येथून निवडणूक लढवतील अशी आधी चर्चा होती. मात्र आशिष शेलार यांनी माघार घेत, जो उमेदवार द्याल तो निवडणूक आणण्याची जबाबदारी घेतली होती, अशी चर्चा होती. 

Topics mentioned in this article