कर्नाटकात निवडणुकीचा प्रचाराची आज सांगता झाली आहे. कर्नाटकातील काँग्रेस नेते डीके शिवकुमार प्रचारासाठी राज्य पिंजून काढत आहे. डीके शिवकुमार यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डीके शिवकुमार यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कार्यकर्त्यांने खांद्यावर हात ठेवल्याने डीके शिवकुमार संतापले. हावेरीच्या सावनूर येथे शनिवारी रात्री ही घटना आहे. काँग्रेस पक्षाचे उमेदवार विनोदा आसुती यांच्या प्रचारासाठी डीके शिवकुमार आले होते.
डीके शिवकुमार यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीयोत दिसतंय की, पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेला एक व्यक्ती डीके शिवकुमार यांच्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. अलाउद्दीन मनियार असं या व्यक्तीच नाव असून ते नगरसेवक आहेत.
(नक्की वाचा- बारामतीत अजित पवार-शरद पवार गटाचे कार्यकर्ते आमने-सामने; सांगता सभेआधीच्या रॅलीतील प्रकार)
अलाउद्दीन मनियार यांना डीके शिवकुमार यांच्यासोबत फोटो काढायचा होता. त्यासाठी समोर एक व्यक्ती कॅमेरा घेऊन उभीही होती. डीके शिवकुमार जवळ येताच मनियार यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संतापलेल्या शिवकुमार यांना मनियार यांच्या कानशिलात लगावली. मात्र त्यानंतरही मनियार हसताना दिसत आहेत. पोलिसांनी देखील मनियार यांना शिवकुमार यांच्या मार्गातून हटवून बाजूल ढकललं. त्यानंतर ते इतर कार्यकर्त्यांमध्ये सामील झाले.
(नक्की वाचा - रावसाहेब दानवेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातला, दानवेंनी काय केलं?)
कर्नाटकात दोन टप्प्यात लोकसभेच्या 28 जागांसाठी निवडणुका होत आहे. 14 जागांसाठी 26 एप्रिल रोजी मतदान पार पडलं आहे. तर उरलेल्या 14 जागांसाठी येत्या 7 एप्रिला रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे.