Pune News: भाजप उमेदवाराच्या पतीचा डान्सबारमध्ये पैसे उडवतानाचा Video!, धंगेकरांच्या ट्वीटने पुण्यात ट्वीस्ट

पुण्यातील भाजपचे नेते गणेश बीडकर आणि एका महिला उमेदवाच्या पतीवर धंगेकरांनी गंभीर आरोप केला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • मतदानाच्या अगोदर शिवसेनेचे नेते रविंद्र धंगेकरांनी भाजप नेत्यांवर आरोप सुरू केले आहेत
  • धंगेकरांनी डान्सबारमधील भाजप नेत्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
  • भाजपच्या एका महिला उमेदवाराच्या पतीवर डान्सबारमध्ये पैसे उडवण्याचा आरोप केला आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

सागर जोशी

महापालिका निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा धुरळाही आता शांत झाला आहे. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकरांनी पुण्यातील भाजप नेत्यांची पोलखोल करायला सुरुवात केली आहे. पुण्यातील भाजपचे नेते गणेश बीडकर आणि एका महिला उमेदवाच्या पतीवर धंगेकरांनी गंभीर आरोप केला आहे. धंगेकरांनी गेल्या दोन तीन दिवसांत ट्वीटची मालिकाच सुरु केली आहे. त्यात डान्सबारमधील भाजप नेत्यांचे व्हिडीओ आणि फोटो दाखवत जोरदार हल्ला चढवला आहे. 

पहिल्या ट्वीटमध्ये धंगेकरांनी एक डान्सबारमधील व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यात पुण्याला वाचवा म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. रविंद्र धंगेकरांचं पहिलं ट्वीट काय आहे ते एकदा पाहूयात. ते म्हणतात दिवसा महिला सुरक्षेचे जाहीरनामे द्यायचे आणि रात्री डान्स बारमध्ये कारनामे करायचे! हे अपेक्षित आहे का सुसंस्कृत पुण्यनगरीमध्ये? अशा लोकांच्या हाती पुण्यनगरीचे नेतृत्व सोपवणार का? विचार करा! आपले पुणे वाचविण्याची हीच ती वेळ..! असे ट्वीट करत त्यांनी धुरळाच उडवून दिला आहे.

नक्की वाचा - Navi Mumbai: मतदाना आधीच जादूटोणा! उमेदवाराच्या कार खाली लींबू, मिरच्या, टाचण्या, उमेदवाराच्या फोटोला तर...

रविंद्र धंगेकरांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये एक व्हिडीओ आणि तीन फोटो शेअर केले आहेत. त्यात भाजपच्या प्रभाग क्रमांक 12 मधील महिला उमेदवाराचा पती डान्सबारमध्ये पैसे उडवत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. रविंद्र धंगेकरांचं दुसरं ट्वीट काय आहे ते पाहूयात. भारतीय जनता पक्षाने उमेदवारी वाटताना चारित्र्यहीन लोकांचं वेगळं आरक्षण टाकले असल्याचं दिसून येत आहे. प्रचार प्रमुखच महापालिकेच्या टेंडरचा पैसा डान्सबारमध्ये उडवत असेल, तर तिकीट दिलेल्या उमेदवारांकडून काय अपेक्षा ठेवणार? ते सुद्धा या चारित्र्यहीन क्वालिटीचेच आहेत. असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.  

पुढे ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात प्रभाग क्रमांक 12 मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार असलेल्या एका महिलेच्या पतीचाही असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्यक्ती शिवाजीनगर मतदारसंघाच्या आमदारांचे आर्थिक विषय सांभाळतो. या सगळ्या आर्थिक विषयातून कमवलेल्या पैशात बारबालांसाठी कोटा आरक्षित ठेवलेला आहे. संस्कृतीच्या गप्पा मारणारे खासदार मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांनी या गोष्टीचा खुलासा तरी करावा, की अशा किती जागा चारित्र्यहीन लोकांसाठी राखीव आहेत.असो ते भाजप आहे या सर्व गोष्टीच त्यांना पार्टी विथ डिफरन्स बनवतात. असं म्हणत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Raj Thackeray: मतदानाच्या एक दिवस आधी राज ठाकरेंचा घणाघात, निवडणूक आयोगावर 2 गंभीर आरोप

तर तिसऱ्या ट्वीटमध्ये धंगेकरांनी पुणेकरांना आवाहन केलं आहे. त्यात त्यांनी भाजप नेते गणेश बीडकर यांचं नाव घेत एक फोटो शेअर केला आहे. रवींद्र धंगेकरांचं तिसरं ट्वीट काय ते ही पाहूयात. पुणेकरांनो तुम्हीच ठरवा..! पुण्यात पब,डान्स बार बंद करणारा धंगेकर पाहिजे? की डान्स बारमध्ये पैसे उडवणारा बीडकर पाहिजे? रविंद्र धंगेकरांच्या या तिनही ट्वीटमुळे पुणे भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. महत्वाची बाब म्हणजे एकीकडे धंगेकरांनी ट्वीटची मालिकाच लावली आहे. तर दुसरीकडे भाजपकडून कुणीही बोलायला तयार नाही. पुण्यात भाजप आणि शिवसेना वेगळी लढत आहे. भाजपसमोर अजित पवारांनीही मोठं आव्हान उभं केलं आहे. अशावेळी मतदानाच्या काही तास आधी धंगेकरांनी रान पेटवल्यानं भाजपच्या अडचणीत मात्र वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.