- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारांच्या नावांच्या क्रमाबाबत नवीन नियमावली
- ईव्हीएम मशीनवर उमेदवारांची नावे पक्षाच्या राष्ट्रीय किंवा प्रादेशिक दर्जाप्रमाणे क्रमवारीने लावली जाणार आहेत
- राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार पहिले दिसतील, त्यानंतर प्रादेशिक पक्षांचे आणि शेवटी अपक्ष उमेदवारांची नावे असतील
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने उमेदवारांच्या नावांच्या क्रमाबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. नव्या गॅझेटनुसार, ईव्हीएम मशीनवर आता उमेदवारांची नावे त्यांच्या पक्षाच्या दर्जाप्रमाणे (Status) लावली जाणार आहेत. यामुळे राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांना प्राधान्य मिळणार आहे. त्यामुळे पहीले नाव हे राष्ट्रीय पक्षाचे असेल. त्या खाली राज्यस्तरीय पक्षाच्या उमेदवाराचे नाव असणार आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
यापूर्वी ईव्हीएमवर उमेदवारांची नावे त्यांच्या आडनावाच्या अद्याक्षराप्रमाणे (Alphabetical Order) लावली जात असत. यामुळे अनेकदा राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांची नावे खाली जात असत. आता नवीन निर्णयानुसार, सर्वात वर राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार, त्यानंतर राज्यस्तरीय प्रादेशिक पक्षांचे उमेदवार आणि शेवटी अपक्ष उमेदवारांची नावे असतील. मतदारांना आपला उमेदवार शोधणे सोपे जावे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यामुळे ईव्हीएमवर पहिल्यांदा राष्ट्रीय पक्षांची नावे येणार आहेत. एक पेक्षा जास्त राष्ट्रीय पक्ष असल्यास त्यांच्या त्यांच्या उमेदवाराच्या आडनावा नुसार त्यांनी ईव्हीएमवर एक, दोन, तीन असा क्रमांक मिळणार आहे. त्यानंतर प्रादेशिक पक्षांना स्थान देण्यात येणार आहे. सर्वात शेवटी अपक्षांचे नाव असेल. त्यामुळे पुर्वी राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांचे नाव खाली जात होते. ते आता जाणार नाही. पहिल्या तीन मध्ये नक्की दिसणार आहे.