जाहिरात

52 वर्षांची मलायका 19 वर्षांनी लहान गुजराती हिरे व्यापाऱ्याला करतेय डेट? आधी नजरा-नजर, डान्सचा तो Video Viral

मलायका अरोरा सध्या या ३३ वर्षांच्या तरुणाला डेट करीत असल्याची चर्चा सुरू आहे.

52 वर्षांची मलायका 19 वर्षांनी लहान गुजराती हिरे व्यापाऱ्याला करतेय डेट? आधी नजरा-नजर, डान्सचा तो Video Viral

Malaika Arora : बॉलिवूडची ग्लॅमरस क्विन मलायका अरोरा कायम विविध कारणांमुळे चर्चेत असते. ५२ वर्षीय मलायका ही ४० वर्षीय अर्जुन कपूरला डेट करीत होती. गेल्या वर्षी त्यांचा ब्रेकअप झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान मलायकाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ चर्चेत आहे. यामागील कारण केवळ मलायका किंवा तिचा डान्स नसून त्या व्हिडिओतील मिस्ट्री बॉय आहे. 

ग्रमी पुरस्कार विजेता एनरिक इग्लेसिसाय याचा काही दिवसांपूर्वी मुंबईत एक संगीत कार्यक्रम झाला होता. बीकेसीमध्ये झालेल्या या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. यामध्ये मलायका अरोराही उपस्थित होती. यावेळी तिच्यासोबत एक तरुण दिसून आला आहे. मलायला अनेकदा त्याच्याशी बोलताना दिसत आहे. तो तरुणदेखील अधून मधून मलायकाकडे पाहतो. मलायका या तरुणाला डेट करीत असल्याची चर्चा सुरू आहे. हर्ष हा मलायकाहून १९ वर्षांनी लहान आहे. 

कोण आहे तो मिस्ट्री बॉय? (Mystery boy in Malaika Arora's dance video)

काही माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार, या तरुणाचं नाव हर्ष मेहता (३३ वर्षे) आहे. तो गुजराती असून हिरे व्यापारी आहे. मूळ गुजरातमधील पालनपूर येथील रहिवासी असलेले हर्षचे कुटुंब बेल्जियममध्ये स्थायिक आहेत. मुंबईतील लिलावती रुग्णालयाच्या विश्वस्तपदावरुन सुरू असलेल्या कायदेशीर वादामुळे हर्ष मेहताचं कुटुंब चर्चेत आहे. हर्षने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे. दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात मलायता हर्षकडे प्रेमाने पाहते आणि नंतर त्याच्या कानात काहीतरी कुजबुजते. या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच दोघांमधी अफेअरची चर्चा सुरू झाली आहे. 

२०२४ मध्ये अर्जुन कपूरशी ब्रेकअप

मलायका अरोराने १२ डिसेंबर १९९८ रोजी सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता अरबाज खानशी लग्न केलं. यानंतर २००२ मध्ये तिने अरहान नावाच्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर २०१६ मध्ये मलायका आणि अरबाजच्या नात्यात दुरावा असल्याच्या बातम्या येऊ लागल्या, पुढे २०१७ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर पुढील कित्येक दिवस मलायकाचे नाव अभिनेता अर्जुन कपूरशी जोडले जात होते. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी आपलं नातं जाहीरपणे स्वीकारलं. साधारण पाच वर्षे नात्यात राहिल्यानंतर २०२४ मध्ये ते दोघे वेगळे झाले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com