जाहिरात

Ajinkya Deo : 61 वर्षांचा अजिंक्य देव दिसतोय पस्तीशीतला ; मिलिंद सोमणलाही टक्कर, नवा लुक पाहून तरुणी फिदा!

Asa Mi Ashi Mi Movie : अजिंक्य देव आणि तेजश्री प्रधान यांच्यातील रोमान्स या चित्रपटात पाहता येणार आहे.

Ajinkya Deo : 61 वर्षांचा अजिंक्य देव दिसतोय पस्तीशीतला ; मिलिंद सोमणलाही टक्कर, नवा लुक पाहून तरुणी फिदा!

ajinkya deo new movie : ८० चं दशक गाजवणारा हँडसम हंक अंजिक्य देव वयाच्या ६१ व्या वर्षीही मराठी चित्रपटसृष्टी गाजवत आहे. नुकताच अजिंक्य देव याचा 'असा मी, अशी मी' नावाचा चित्रपट 28 नोव्हेंबरला प्रसिद्ध झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात ६१ वर्षीय अंजिक्य देव ३७ वर्षांच्या तेजश्री प्रधानसोबत दिसत आहे. आतापर्यंत बॉलिवूडमधील शाहरुख आणि सलमान खान वयाच्या साठीतही तरुण अभिनेत्रींसोबत रोमॅन्स करताना दिसत होते. वयाच्या साठीतही ते किती तरुण दिसतात म्हणून त्यांच्या फिटनेसचं कौतुक केलं जातं. तोच कित्ता आता मराठीतही गिरवताना दिसत आहे. वयाची ६१ शी गाठलेला अजिंक देव या चित्रपटात अक्षरश: तिशीतला दिसतोय अशी प्रतिक्रिया येत आहे. अजिंक्य देवच्या चाहत्यांनीही त्याच्या कमबॅकवर आनंद व्यक्त केला आहे. 

अजिंक्य देव अन् तेजश्री प्रधानचा इंटिमेट सीन...

'असा मी, अशी मी' हा चित्रपट इंग्लंडमध्ये चित्रित केल्याचं ट्रेलर आणि गाण्यांमधून दिसत आहे. या चित्रपटात अजिंक्य देव एका भारतीय फोटोग्राफरची भूमिका साकारत आहे. स्टायलिश, आत्मविश्वासाने भरलेला आणि कमिंटमेंट-लग्न यापासून काहीसा दूर राहणाऱ्या तरुणाच्या भूमिका अंजिक्य देव दिसत आहे. तर तेजश्री प्रधान ही टूर आयोजक असून तिचा स्वभाव काहीसा विरोधी आहे. अशा या परस्परविरोधी स्वभावाच्या व्यक्तींमधील लव्ह स्टोरी हे या चित्रपटाचं कथानक आहे. 

अजिंक्य देववर तरुणी फिदा...

८० आणि ९० चं दशक गाजवणारा अंजिक्य देव २०२५ मध्येही तितकाच हँडसम दिसत आहे. त्याचा नवा लुक पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. फिटनेसच्या बाबतीच ६१ वर्षांचा अंजिक्य देव ६० वर्षांच्या मिलिंद सोमणलाही टक्कर देत आहे. 

अजिंक्य देव यांचा चित्रपट....

घरात
सौ शशी देवधर
रिंगा रिंगा
वासुदेव बळवंत फडके
लपंडाव
जिवासखा
माहेरची साडी
शाबास सुनबाई

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com