गौरीशी लग्न केल्यानंतर दोन्ही EX सोबत एकत्र राहणार आमिर खान? 100 कोटींचा एडव्हान्स, स्वप्नांचा महाल कसा असेल?

सुपरस्टार आमिर खानचा एक निर्णय सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Aamir Khan New Home : बॉलिवूडमध्ये बऱ्याचदा नात्यातील दुराव्याबद्दलच्या बातम्या चर्चेत असतात. मात्र अशातच सुपरस्टार आमिर खानचा एक निर्णय सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. गौरी स्प्रैटसोबत तिसरं लग्न केल्यानंतरही त्याने आपल्या कुटुंबाला अग्रस्थानी ठेवल्याचं म्हटलं जात आहे. त्याच्या ड्रिम होमबाबत समोर आलेली माहिती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. 

नव्या घरासाठी १०० कोटींचं एडव्हान्स बुकिंग...

आमिर खानने आपल्या नव्या घरासाठी १०० कोटींहून अधिक एडवान्स दिलं आहे. मात्र हैराण करणारी बाब याची किंमत नाही तर त्यात राहणाऱ्यांच्या यादीबाबत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमिर केवळ पत्नी गौरी आणि मुलासह येथे राहणार नाही. तर आमिर खान दोन्ही एक्ससह संपूर्ण कुटुंबासह एकाच छताच्या खाली राहण्याच्या तयारीत आहे. आमिर खानचा मेगा फॅमिली प्लान काय आहे, अनेकजण याची चर्चा करीत आहे. 

Advertisement

पहिल्या दोन्ही पत्नींसोबत एकाच छताखाली राहणार...

फ्री प्रेस जर्नलसह अनेक वृत्तसंस्थांच्या वृत्तानुसार, आमिर आणि गौरी यांचं एक घर खारमधील एका भागात तयार होणार आहे. हे घर कोणताही महाल किंवा स्काय व्हिलापेक्षा कमी नाही. यासाठी सुपरस्टार १०० कोटींहून अधिक किंमतीचे एडव्हान्स दिले आहेत. सध्या दोघे मुंबईतील पाली हिल येथील विलनोमोना इमारतीत भाड्याने राहतात. मात्र त्यांचं निश्चित पत्ता खारमधील यूनियन पार्क जवळ असेल. या प्रकल्पाचे बांधकाम सध्या सुरू असून तो २०३० पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

नक्की वाचा - Akshay Kumar : चित्रपटांमधून तर कोट्यवधींची कमाई; मुंबईतील घरांमुळेही अक्षय कुमार कसा होतोय श्रीमंत?

या गगनचुंबी इमारतीचे सर्वात वरचे तीन मजले आमिर खान, त्याची पत्नी गौरी स्प्रॅट आणि गौरीचा पहिल्या लग्नापासूनचा मुलगा क्विन यांचे मुख्य निवासस्थान असेल. ज्यांनी इमारतीचे आराखडे पाहिले आहेत, त्यांच्या मते हे मुंबईतील सर्वात सुंदर आणि आलिशान सेलिब्रिटी घरांपैकी एक असेल.

कोण कुठे राहणार? 

आमिर खानला पार्टी देणं किंवा पाहुणचार करायला आवडचं. त्यासाठी कौटुंबिक कार्यक्रम किंवा खासगी पार्टीसाठी त्यांनी एक फ्लोर दिला आहे. या आलिशान व्हिलाची सर्वात खास बाब म्हणजे आमिर खान त्याचं संपूर्ण कुटुंब एकाच छताखाली सुरक्षित ठेवण्याचा प्लान केला आहे. काही वृत्तांनुसार, आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ता तिचा मुलगा जुनैदसाठीही एक फ्लोर तयार करण्यात येणार आहे. केवळ जुनैदच नाही तर आमिर खानची दुसरी पत्नी किरण राव आणि तिचा मुलगा आझाद राव खान यांच्यासाठीही या इमारतीत वेगवेगळे फ्लॅट्स दिले जातील. आमिर खानची आई जीनत हुसैन, त्यांच्या दोन्ही बहिणी निखत आणि फरहतदेखील या इमारतीत वेगवेगळ्या अपार्टमेंटमध्ये राहतील. सध्या आमिर त्याची आई, दोन मुले आणि पत्नी गौरी आणि क्विनसोबत राहण्यासाठी विलानोमोना इमारतीत चार आलिशान फ्लॅटचे भाडे देत आहे.