Akshay Kumar News : अभिनेता अक्षय कुमारसाठी सध्या अच्छे दिन आले आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला त्याचा चित्रपट भूत बंगला हिट झाला. याशिवाय त्याचा लेटेस्ट चित्रपट 'वेलकम टू द जंगल' देखील बंपर कमाई करीत आहे. यादरम्यान अक्षय कुमारने मुंबईत आपले दोन लग्जरी अपार्टमेंट कोटींचा नफा घेत विकले आहेत. अक्षयने मुंबईतील मुलुंड स्थित दोन लग्जरी अपार्टमेंट १२.३८ कोटींना विकले. सीआरई मेट्रिक्सला मिळालेल्या रजिस्ट्रेशन डॉक्यूमेंट्सनुसार, अक्षयने दोन्ही अपार्टमेंट २०१७ मध्ये ९ कोटींना खरेदी केले होते.
हे दोन्ही अपार्टमेंट मुलुंड पश्चिममधील एलबीएस रोडवरील ऑबेरॉय रियल्टीच्या प्रीमियम रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ऑबेरॉय एनिग्माच्या वरच्या मजल्यावर आहे. डॉक्यूमेंट्सनुसार, प्रत्येक अपार्टमेंटचा कार्पेट एरिया १,८८६ स्क्वेयर फूट आहे आणि दोन्ही अपार्टमेंटचे मिळून सहा डेडिकेटेड कार पार्किंग स्पेस आहे.
अक्षयने ६.१९-६.१९ कोटींना विकले दोन अपार्टमेंट...
प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनच्या डॉक्यूमेंट्सनुसार, अक्षय कुमारचे हे दोन्ही अपार्टमेंट सनी होम केयर प्रायव्हेट लिमिटेडने खरेदी केले आहेत. प्रत्येक अपार्टमेंट ६.१९ कोटींना विकला आहे. ज्याचं एकूण ट्रान्जॅक्शन मूल्य १२.३८ कोटी झालं आहे. खरेदीदारने ट्रान्जॅक्शनसाठी ३७.१४ लाख स्टॅम्प ड्यूटीसाठी मोजले, जी एकूण ७४.२८ लाख झाली आहे.
दोन्ही अपार्टमेंट विकून अक्षयला किती फायदा झाला?
अक्षय कुमारने हे दोन्ही अपार्टमेंट ऑक्टोबर २०१७ मध्ये खरेदी केले होते. तेव्हा दोन्ही अपार्टमेंटची किंमत साधारण ४.४९ कोटी होती. रजिस्ट्रर ट्रान्जॅक्शन मूल्याच्या आधारावर अक्षयने प्रत्येक अपार्टमेंट त्याच्या खरेदी किमतीपेक्षा जवळपास १.७० कोटींहून जास्तमध्ये विकला. ज्यानुसार ९ वर्षात ३८ टक्क्यांची वाढ झाल्याचं स्पष्ट होतं.
जून २०२६ मध्ये ७.१ कोटींना विकले दोन अपार्टमेंट...
अक्षय कुमार चित्रपटांव्यतिरिक्त रियल इस्टेट गुंतवणुकीमुळेही अनेकदा चर्चेत असतो. २ जून २०२६ रोजी त्याने मुंबईतील बोरीवली पूर्वेकडील ऑबेरॉय स्काय सिटीमध्ये दोन अपार्टमेंट विकले होते. ७.१ कोटींना हे अपार्टमेंट विकण्यात आले होते. डॉक्यूमेंट्सनुसार, अक्षयने यातील एक अपार्टमेंट नोव्हेंबर २०१७ मध्ये ३ कोटी आणि दुसरा ६७.५५ लाखांत खरेदी केला होता.
२०२५ मध्ये २ अपार्टमेंट विकून मिळवलं ९२ टक्के रिटर्न...
२०२५ मध्ये अक्षय कुमारने मुंबईतील बोरीवली पूर्वेतील त्याच इमारतीतील दोन अन्य अपार्टमेंट विकले होते. त्याने तो अपार्टमेंट ७.१० कोटींना विकले होते. अक्षयने हे दोन्ही अपार्टमेंट २०१७ मध्ये ३.६९ कोटींना खरेदी केले होते आणि डॉक्यूमेंटनुसार गेल्या ८ वर्षात या दोन अपार्टमेंटमधून त्याला ९२ टक्के रिटर्न मिळालं होतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world