Aankhen Khuli thi Aaye Song Story: संगीत हा मानवी आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे. जे दुःख, आनंद हजारो शब्दात मांडता येत नाही ते गाण्यांच्या चार ओळींमधूनही व्यक्त करता येते. म्हणूनच चित्रपटांतील गाण्यांमध्ये लोकांच्या भावनांना, अंतर्मनाला स्पर्श करण्याची ताकद असते. पण एखादे गाणे ऐकून मृत्यूच्या दारात असलेल्या बेशुद्ध मुलाचे डोळे उघडले तर? अगदी चित्रपटाच्या कथेसारखी वाटणारी ही गोष्ट खरी आहे. मजरूह सुलतानपुरी यांच्याबाबत अशीच घटना घडली होती. त्यांनी लिहिलेल्या एका गाण्याने मुलाला पुन्हा जिवंत केले होते. ज्याच्या जगण्याची आशा डॉक्टरांनीही सोडून दिली होती. ही कथा आजही संगीताच्या सामर्थ्याच्या सर्वात लोकप्रिय उदाहरणांपैकी एक मानली जाते.
NEET Paper Leak: "मी स्वतः दोनदा नीट परीक्षा दिलीय!" अभिनेत्रीची भावुक पोस्ट; CJP आंदोलनाला पाठिंबा
एका गाण्याची अजब जादू.. कोमात गेलेल्या मुलाने डोळे उघडले!
मजरूह सुलतानपुरी यांनी स्वतः एका मुलाखतीत ही कथा सांगितली. त्यांचा अहमद नावाचा एक मित्र होता, जो त्यांच्या गाण्यांचा खूप मोठा चाहता होता. त्याने मजरूह यांनी लिहिलेल्या जवळपास प्रत्येक गाण्याची नोंद घरी ठेवली होती. पण त्याच्या मुलाचे आयुष्य एका अशा आजाराने ग्रासले होते, ज्यावर कोणत्याही डॉक्टरकडे इलाज नव्हता. ते मूल नीट बोलू किंवा ऐकू शकत नव्हते. ते तासनतास एकाच जागी बसून राहायचे.
मात्र, एका गोष्टीने सर्वांनाच गोंधळात टाकले होते. जेव्हा कधी मुकेशचं गाणं लागायचं, तेव्हा तो अचानक आनंदी व्हायचा, नाचायला लागायचा आणि त्याचा चेहरा उजळून निघायचा. मग एके दिवश, त्याची तब्येत इतकी खालावली की तो कोमात गेला. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेरीस, त्यांनी कुटुंबीयांना सांगितले की कोणतेही औषध नाही, फक्त प्रार्थनाच उपयोगी पडेल. हताश होऊन अहमदने आपल्या मुलाला घरी आणले.
<
गाणं वाजलं... मुलाने डोळे उघडले!
घरी आल्यावर अहमदने एक निर्णय घेतला. त्याने 'साथी' चित्रपटाच्या अल्बममधील एक गाणं लावलं, ज्याचे बोल होते: "आँखों खुली थी आये थे वो भी नजर मुझे..." असं म्हणतात की गाणं वाजताच, १५ दिवसांपासून कोमात असलेला तो मुलगा हळूहळू डोळे उघडू लागला. कुटुंबीय आश्चर्यचकित झाले. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. संपूर्ण गाणं ऐकल्यानंतर त्या मुलाने अखेरचा श्वास घेतला. पण ही घटना लोकांच्या स्मरणात कायमची कोरली गेली. जेव्हा मजरूह सुलतानपुरी यांनी हे संगीत दिग्दर्शक नौशाद यांना सांगितले, तेव्हा ते म्हणाले की हा केवळ सुरांचा प्रभाव नव्हता, तर मुकेशच्या आवाजाचा, मजरूहच्या शब्दांचा आणि संगीतातील भावनांचाही प्रभाव होता.
(नक्की वाचा- VIDEO: मस्ती जिरली! महिला आंदोलकाच्या कानाखाली मारणाऱ्या DCP ला दणका; हायकोर्टाच्या ताशेऱ्यांनंतर कारवाई)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world