Abhishek Bachchan : घटस्फोटाच्या चर्चांचा आराध्यावर काय परिणाम? अभिषेक बच्चननं पहिल्यांदाच मौन सोडलं

Abhishek Bachchan Opens Up on Divorce Rumours: अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे बॉलिवूडमधील सर्वात चर्चित जोडप्यांपैकी एक आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची नेहमीच चर्चा होत असते.

जाहिरात
Read Time: 3 mins
Abhishek Bachchan- Aishwarya Rai Bachchan : अभिषेकनं आराध्याबाबत मोठा खुलासा केला आहे.
मुंबई:

Abhishek Bachchan Opens Up on Divorce Rumours: अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे बॉलिवूडमधील सर्वात चर्चित जोडप्यांपैकी एक आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची नेहमीच चर्चा होत असते. काही महिन्यांपूर्वी त्यांचा घटस्फोट होणार असल्याचं गॉसिपही जोरदार चर्चेत होतं. या सततच्या चर्चा आणि गॉसिपचा त्यांच्या कुटुंबावर विशेषत: त्यांची मुलगी आराध्या बच्चनवर (Aaradhya Bachchan) काय परिणाम झाला आहे, याबाबत अभिषेक बच्चननं पहिल्यांदाच माहिती दिली आहे. 

ऐश्वर्याने आराध्याला शिकवले महत्त्वाचे धडे

'पिपींगमून'ला दिलेल्या मुलाखतीत अभिषेकनं सांगितलं की, त्यांच्या सार्वजनिक आयुष्याभोवती होणाऱ्या गदारोळातून मार्ग काढण्यासाठी ऐश्वर्याने त्यांच्या मुलीला खास धडे दिले आहेत. तो म्हणाले, "ऐश्वर्याने आराध्यामध्ये चित्रपटसृष्टी आणि आम्ही जे काम करतो त्याबद्दल खूप आदर निर्माण केला आहे. चित्रपट आणि प्रेक्षकांनी आम्हाला जे काही दिले आहे, त्यामुळेच आम्ही आहोत हे तिने तिला शिकवले आहे."

अभिषेक पुढे म्हणाला, आराध्या एक आत्मविश्वासपूर्ण आणि स्वतंत्र विचारांची टीनएजर म्हणून मोठी होत आहे. ते म्हणाले, "तिला मतं आहेत. ती खूप ठाम विचारांची टीनएजर आहे. तिची स्पष्ट मतं आहेत, ज्यावर आम्ही खासगीमध्ये चर्चा करतो, पण प्रत्येक गोष्ट व्यक्त करण्याची तिची एक सुंदर पद्धत आहे."

( नक्की वाचा : कोण होता रहमान डकैत? Dhurandhar मध्ये Akshaye Khanna ने साकारलीय भूमिका, स्वत:च्या आईचीच केली होती हत्या )

 सोशल मीडियापासून दूर

ज्या वातावरणात आराध्या मोठी होत आहे, तेथे सोशल मीडिया आणि गॉसिप पोर्टल्सचा भडिमार असला तरी ती या सगळ्यापासून बऱ्यापैकी दूर आहे.तिच्याकडे मोबाइल फोन नाही आणि ती अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रित करते, असा खुलासाही अभिषेकनं केला.

अभिषेक यावेळी म्हणाला की, "ती 14 वर्षांची आहे आणि तिच्याकडे फोन नाही. तिच्या मित्रांना तिच्याशी संपर्क साधायचा असेल, तर त्यांना तिच्या आईच्या फोनवर कॉल करावा लागतो आणि हा निर्णय आम्ही खूप पूर्वीच घेतला होता.

" तिला इंटरनेटचा वापर करण्याची सुविधा असली तरी तिचा वापर केवळ शैक्षणिक कार्यासाठी केला जातो. तो याबाबत म्हणाला की, "तिला इंटरनेटचा ॲक्सेस आहे, पण तिला गृहपाठ करणे आणि संशोधन करण्यात अधिक रस आहे. तिला शाळा खूप आवडते, त्यामुळे ती त्यात गुंतलेली असते."

अफवांचा आराध्यावर काय परिणाम होतो?

आराध्या तिच्या आई-वडिलांबद्दलच्या अफवा किंवा चर्चा वाचते किंवा तिचा त्यावर काही परिणाम होतो का, याबद्दल बोलताना अभिषेक म्हणाले की, अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये तिला रसच नाही. त्यांनी माहिती दिली, "मला वाटत नाही की यात तिला काही रस आहे. मला वाटतं ती जे काही वाचते त्यावर विश्वास ठेवणार नाही. तिने जे काही वाचले त्यावर विश्वास ठेवू नये, हे तिच्या आईने तिला शिकवले आहे."

Advertisement

अभिषेकने पुढे स्पष्ट केले की, त्यांच्या घरात पारदर्शक वातावरण आहे, ज्यामुळे अनावश्यक शंका किंवा गोंधळ दूर राहतात. माझ्या आई-वडिलांनी माझ्यासोबत जसे केले, तसेच आम्ही कुटुंबासोबत पूर्णपणे प्रामाणिक आहोत. त्यामुळे आम्ही कधीही अशा परिस्थितीत नसतो जिथे कुणाला कोणावर शंका घ्यावी लागेल."

( नक्की वाचा : अभिषेक-ऐश्वर्यामुळे चर्चेत आलेला Grey Divorce प्रकार काय आहे? तो का घेतला जातो? )

धूम्रपानाबद्दल मोठा खुलासा

 ऐश्वर्या गरोदर असल्याचे कळल्यानंतर अभिषेकनं धूम्रपान आणि मद्यपान सोडले, या बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या चर्चांनाही त्यानं या मुलाखतीमध्ये दुजोरा दिला. ही चर्चा खरी असल्याचे सांगून तो म्हणाला, "मी या दोन्ही गोष्टी थांबवल्या आहेत. मी त्यांना आता अजिबात हात लावत नाही."

अभिषेक आणि ऐश्वर्याचं लग्न 2007 साली झालं. तर 2011 साली आराध्याचा जन्म झाला. 

Topics mentioned in this article