सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शहजाद याने प्लानिंक करून सैफच्या घरावर हल्ला केला होता. काही दिवसांपूर्वी सैफच्या घरात तो हाऊसकिपींगच्या निमित्ताने आला होता. तेव्हाच त्याने घरांची रेकी केली होती. त्यामुळे सैफच्या घरात कुठे काय आहे याची त्याला सर्व माहिती होती. दरम्यान या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
सैफ अली खानच्या घरात घुसण्याआधी आरोपी मोहम्मद शहाजादने अनेक सेलिब्रेटींच्या घराची रेकी केली होती. वांद्रे परिसरात वास्तव्यास असणाऱ्या अनेक सेलिब्रेटींच्या घराची रेकी केली होती. अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि सैफ अली खानच्या घरासह त्याने अनेक घरांची रेकी केली होती. एका रिक्षातून प्रवास करताना रिक्षाचालकाकडून या सेलिब्रेटिंच्या घराबद्दलची माहिती आरोपीने मिळवली होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
नक्की वाचा - Saif Ali Khan Attacked: सैफच्या घरात हल्लेखोर कसा घुसला? चौकशीत धक्कादायक माहिती आली समोर
सैफ अली खानच्या घरात घुसखोरी करण्याच्या दृष्टीने अधिक सोयीचे वाटल्याने आरोपीने हे घर निवडलं. सैफचा मुलगा जहांगीरला ओलीस ठेवून आरोपी पैशांची मागणी करणार होता, अशीही माहिती समोर आली आहे. मात्र हे करत असताना घरातले सगळेच जागे झाल्याने आरोपी घाबरला आणि सुटकेसाठी बिथरलेल्या आरोपीने अंधाधुंद वार करण्यास सुरुवात केली.
याचवेळी आरोपीने सैफ अली खानवर एकूण सहा वार आरोपीने केली आणि तिथून फरार झाला. आरोपीला बांगलादेशात पुन्हा जाण्यासाठी बनावट पासपोर्ट हवा होता त्यासाठीच पैशांची व्यवस्था करण्यासाठी त्याने चोरीचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. आरोपीच्या चौकशीअंती अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.