Nashibvan Serial: क्रूर, खुनी, राक्षसासारखा करणार लोकांचा छळ! बाजीप्रभू साकारणाऱ्या नटाचे खलनायक म्हणून कमबॅक

Nashibvan Serial Star Pravah: स्टार प्रवाह मराठी मनोरंजन वाहिनीवर 'नशीबवान' नावाची नवीकोरी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेद्वारे एक दर्जेदार कलाकार तब्बल सहा वर्षांनंतर मालिका विश्वामध्ये कमबॅक करतोय.

जाहिरात
Read Time: 2 mins
Nashibvan Serial Star Pravah: नशीबवान मालिका लवकर येतेय भेटीला

Nashibvan Serial Star Pravah: स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नशीबवान असे मालिकेचे नाव आहे. मालिकेचे टीझर पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालीय. मालिकेमध्ये गिरीजा नावाच्या मुलीची कहाणी पाहायला मिळणार आहे. गिरीजाच्या आयुष्यात अनेक आव्हानं आहेत. आई-वडिलांचं प्रेम नाही, लहान वयातच आलेली घराची जबाबदारी आणि जगण्यासाठीचा संघर्ष असे खडतर आयुष्य गिरीजाच्या नशिबी आलंय. मात्र या कठीण प्रवासात ती नशीबवान आहे, याचा उलगडा तिला होतो. गिरीजा नशीबवान का? आणि कशी ठरते? याची गुंफलेली सुंदर गोष्ट "नशीबवान" मालिकेमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

प्रसिद्ध अभिनेता साकारणार खलनायक, कोण आहे तो?

मोठ्या पडद्यावर मोठमोठी पात्रं साकारलेला अभिनेता या मालिकेद्वारे तब्बल सहा वर्षांनंतर मालिका विश्वामध्ये कमबॅक करतोय. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अजय पूरकर आहे. अजय पूरकर या मालिकेमध्ये खलनायक म्हणजेच नागेश्वर घोरपडे नावाच्या व्यक्तीचे पात्र साकारणार आहे. नागेश्वर आपल्या पैशांच्या जोरावर सामान्य माणसांना त्रास देतो. खून करायलाही मागेपुढे पाहत नाही. देवीची पूजा करतो, पण राक्षसासारखा लोकांचा छळ करतो. इतका क्रूर वागूनही तो कधीच कोणत्याच केसमध्ये अडकत नाही. 

Advertisement

(नक्की वाचा: Priya Bapat Andhera Web Series: कदमला दिलेली केस बंद होणार? प्रिया बापट दिसणार दमदार लेडी सिंघमच्या भूमिकेत)

Photo Credit: Star Pravah Channel

अजय पूरकरने मालिकेबाबत काय सांगितले?

हे खूनशी पात्र साकारणं किती आव्हानात्मक आहे हे सांगताना अजय पूरकर म्हणाला की,"जवळपास सहा वर्षांनंतर मालिकेमध्ये काम करतोय. मला नागेश्वर हे पात्र ऐकताच क्षणी खूप आवडले. एकतर स्टार प्रवाहसारखी नंबर वन वाहिनी आणि कोठारे व्हिजन्स सारखी निर्मिती संस्था असताना नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. महेश कोठारेंसोबत काम करण्याचे माझे स्वप्न या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण होतंय. नागेश्वर या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत. या पात्राच्या अनुषंगाने मालिकेची गोष्ट घडणार आहे. याआधी मी इतका प्रभावशाली खलनायक साकारलेला नाही. त्यामुळे नागेश्वर साकारताना अभिनेता म्हणून माझा कस लागणार आहे. तेव्हा नक्की पाहा आमची नवी मालिका नशीबवान लवकरच फक्त स्टार प्रवाहवर".
(नक्की वाचा: Rinku Rajguru Photos: अभिनेत्री रिंकू राजगुरूचा महाराणी लुक, चाहते झाले फिदा)

Advertisement