Akshaye Khanna Video: धुरंधर सिनेमामध्ये अक्षय खन्नाने रहमान डकैत हे पात्र साकारलंय, त्याच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक केले जातंय. छावा सिनेमानंतर अक्षयच्या धुरंधर सिनेमालाही प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. सोशल मीडियावरही अक्षय खन्नाचे रिल्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, इतकं सर्व काही होत असताना अक्षय खन्ना आहे तरी कुठे? असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. सिनेमातील प्रत्येक कलाकार कोणत्या-न्-कोणत्या माध्यमातून प्रसिद्धी माध्यमांमध्ये चर्चेत आहेत, पण अक्षय खन्ना कुठेच दिसला नाही. यादरम्यान सोशल मीडियावर अक्षय खन्नाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
तो सध्या काय करतोय? | Akshaye Khanna Alibaug Video Viral
आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर सिनेमा सध्या सोशल मीडियावर चर्चेत असताना अक्षय खन्नाने प्रसिद्धी माध्यमांपासून दूर राहणं पसंत केलंय. अक्षयचा अलिबागच्या घरातील व्हिडीओ व्हायरल होतोय. शिवम म्हात्रे नावाच्या एका पुजाऱ्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय, ज्यामध्ये अक्षयने अलिबागमधील आपल्या घरी वास्तूशांती हवन केल्याची माहिती त्यांनी दिलीय. तीन पुजाऱ्यांसह अक्षय हवन-पूजा करताना व्हिडीओमध्ये दिसतोय.
पुजारी शिवम म्हात्रे यांनी व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, "अभिनेता अक्षय खन्ना यांच्या निवासस्थानी पूजा करण्याचा मान मिळाला. त्यांचा शांत स्वभाव, साधेपणा आणि सकारात्मक ऊर्जेमुळे हा अनुभव खरंच खास बनला."
(नक्की वाचा: Dhurandhar Movie: अक्षय खन्नाच्या Ex गर्लफ्रेंडची ती पोस्ट चर्चेत, धुरंधर अभिनेत्याने नात्याबाबत काय सांगितलं होतं?)
Akshaye Khanna Performs Vastu Shanti Hawan At Alibaug Mansion
एका नेटकऱ्याने म्हटलंय की, "मला या व्यक्तीसारखं व्हायचंय, दिखावा नाही, समाधानी, या व्यक्तीमध्ये शांत आत्मविश्वास आहे. आपलं काम परिपूर्णतेने करतो आणि गायब होतो. कोणतंही ओव्हरअॅक्टिव्ह पीआर नाही"
(नक्की वाचा: Dhurandhar Akshaye Khanna: गदर फेम अभिनेत्रीकडून अक्षय खन्नाचं कौतुक, म्हणाली: सर्वांचे डोळे उघडले... सर्वांना चपराक...)
अक्षय खन्नाचे सर्वत्र होतंय कौतुक
छावा सिनेमामध्येही अक्षयचा दमदार आणि प्रभावशाली अभिनय पाहायला मिळाला होता, इतक्या वर्षांनंतर त्याला मोठ्या पडद्यावर पाहताना प्रेक्षकही भारावून गेले होते. सिनेरसिकांच्या मनामध्ये अक्षय खन्नाचे विशेष स्थान आहे. धुरंधर सिनेमातील अक्षय खन्नाचा अभिनय आणि FA9LA गाण्यावरील त्याच्या डान्सने सोशल मीडियावर धुरळा उडवलाय. नेटकरी त्याची स्टाइल कॉपी करून रिल्स तयार करत आहेत.