Dhurandhar Akshaye Khanna: धुरंधर सिनेमामध्ये अक्षय खन्नाने रहमान डकैतची (Rehman Dakait) भूमिका साकारलीय. सर्वजण त्यानं साकारलेल्या पात्राचे कौतुक करत आहेत. अक्षय खन्ना रणवीर सिंहवर भारी पडलाय, असं प्रेक्षकही म्हणत आहेत. सोशल मीडियावरही अक्षय खन्ना ट्रेंडमध्ये आहे. यादरम्यान को-स्टार अमिषा पटेलनंही अक्षय खन्नाचे कौतुक करणारी पोस्ट शेअर केलीय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अमिषा पटेलनं अक्षयसाठी पोस्ट शेअर करत गंमतीशीर अंदाजात म्हटलंय की, "जर ट्रेंड व्हायचं असेल तर अक्षय खन्नाबाबत चर्चा करा आणि सिनेमा हिट व्हावा अशी इच्छा असेल तर त्याला कास्ट करा". धुरंधर सिनेमाच्या माध्यमातून अक्षय खन्नाचे जबरदस्त कमबॅक केलंय. सिनेमात त्याने केलेला अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडलाय.
गदर सिनेमा फेम अभिनेत्रीने नेमकं काय म्हटलंय?
अमिषा पटलेन पोस्टमध्ये लिहिलंय की, "सोशल मीडियावर ट्रेंड व्हायचं असेल तर अक्षय खन्नाबाबत चर्चा करा, सिनेमा चांगला चालावा अशी इच्छा असेल तर त्याला कास्ट करा. अखेर ब्रँड अक्षयने सर्वांचे डोळे उघडले, असे वाटतंय. वर्षानुवर्षे आंधळे असलेले लोक अचानक आता त्याच्या प्रेमाचा शोध घेतायेत. तुझ्या परफॉर्मेन्सने सर्वांना चपराक दिलीय. मला तुझा अभिमान आहे".
If u want to trend on social media then talk about AKHSAY KHANNA 😜I'f u want ur film to run then let's take AKSHAY KHANNA 😜.. .. seems like Brand AKSHAY has finally opened the eyes of all who were blind for so many Years and all seem to suddenly find their long lost love for…
— ameesha patel (@ameesha_patel) December 15, 2025
(नक्की वाचा: Dhurandhar Box Office Collection: धुरंधरची बॉक्सऑफिसवर छप्परफाड कमाई, 'पुष्पा 2'लाही टाकलं मागे, पुणेकरांसाठी गुड न्यूज)
अक्षय खन्नाचा अभिनय कसा आहे?
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमामध्ये रणवीर सिंह आणि अक्षय खन्ना यांची प्रमुख भूमिका आहे. अक्षय खन्नाने सिनेमामध्ये रहमान डकैत हे खलनायकाचे पात्र साकारलंय. धुरंधर सिनेमा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world