Dharmendra Health Update: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी सकाळी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या त्यांच्यावर घरात उपचार सुरु असल्याची पुष्टी डॉक्टर आणि कुटुंबीयांनी केली आहे. कुटुंबाने चाहत्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “धर्मेंद्र ठीक आहेत. ते नेहमीप्रमाणे आपल्या चाहत्यांवर प्रेम करतात.”
सगळं देवाच्या हातात- हेमा मालिनी
हेमा मालिनी यांनीही त्यांच्या तब्येतीबाबत माहिती देताना सांगितले की, “गेल्या काही दिवसांत आम्ही खूप तणावाखाली होतो. आमच्यासाठी हा कठीण काळ होता. धरमजींची तब्येत आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. मुलं रात्री झोपत नव्हती. पण आता ते घरी परतले आहेत. त्यांना कुटुंबीयांसोबत राहणे गरजेचं आहे. यामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे. बाकी सगळं देवाच्या हातात आहे. कृपया त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा.” नवभारत टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
(नक्की वाचा- Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना डिस्चार्ज मिळाला! घरी कशी काळजी घेतली जाणार? डॉक्टरांनी दिली माहिती)
धर्मेंद्र यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी सांगितले की, “त्यांच्यावर उपचार आणि देखरेख घरातच सुरू राहील. कुटुंबाने त्यांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतला आहे.”
(नक्की वाचा- Dharmendra : धर्मेंद्रचा एकही रुपया हेमा मालिनीला मिळणार नाही? कोणाला सर्वाधिक भाग, कायदा काय सांगतो?)
दरम्यान, धर्मेंद्र यांचे चुलत भाऊ गुड्डू धनोआ यांनी जुहू येथील त्यांच्या घरी भेट दिली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले, “मी फक्त एवढंच सांगू शकतो की ते ठीक आहेत. यापेक्षा अधिक काही सांगू शकत नाही.” धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबतच्या अफवांना या अपडेटनंतर पूर्णविराम मिळाला आहे.