Dharmendra Property Distribution : बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता धर्मेंद्रने आपल्या जबरदस्त अभिनयाने मोठं नाव कमावलं. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांच्या चाहत्यांची संख्या कोणत्याही तरुण अभिनेत्यापेक्षा अधिक आहे. त्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं. धर्मेंद्र आरामदायक जीवन जगतात. ते निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या फार्महाऊसमध्ये राहतात. धर्मेंद्र यांची नेटवर्थ ४५० कोटी आहे. त्यांच्या संपत्तीची लिस्टही खूप मोठी आहे. धर्मेंद्रच्या नेटवर्थबद्दल जाणून घेऊया, याशिवाय त्यांच्या संपत्तीत सर्वाधिक भाग कुणाला मिळणार हेदेखील पाहूया.
धर्मेंद्रची नेटवर्थ किती आहे?
वृत्तांनुसार, धर्मेंद्रची नेटवर्थ ४०० ते ४५० कोटींच्या घरात आहे. ते वयाच्या ८९ व्या वर्षीही चित्रपटात काम करतात. त्यांचा चित्रपट 'इक्कीस' या वर्षी डिसेंबरमध्ये रिलिज होणार आहे. चित्रपटांशिवाय ब्रँड एंडोर्समेंट आणि बिजनेस इंवेस्टमेंटमधूनही त्यांची चांगली कमाई होते. याशिवाय मुंबईत त्यांचा भलामोठा बंगलाही आहे. त्याशिवाय खंडाळा आणि लोणावळ्यात फार्महाऊस आहे. त्यांच्या नावे अनेक रियल इस्टेट प्रॉपर्टीजदेखील आहे. याशिवाय ते Garam-Dharam नावाची प्रसिद्ध रेस्टॉरेंट चेनही चालवतात. त्यांचं हे रेस्टॉरंट प्रसिद्ध आहे. अनेक शहरांमध्ये त्यांचं हे रेस्टॉरंट आहे. धर्मेंद्रकडे अनेक लग्जरी गाड्या आहेत. त्यांच्याकडे मर्सिडीज बेंज एस-क्लास, लँड रोवर रेंज रोवर सारख्या कार आहेत.
धर्मेंद्रला किती मुलं आहेत? l How many children does Dharmendra have?
वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर धर्मेंद्रने दोन लग्न केली आहेत. पहिल्या पत्नीचं नाव प्रकाश कौर आणि दुसरी पत्नी हेमा मालिनी. दोन पत्नींकडून त्यांना सहा मुलं आहेत. पहिल्या पत्नीकडून धर्मेंद्रला चार मुलं आहेत. या मुलांची नावं आहेत, सनी देओल, बॉबी देओल, अजीता देओल आणि विजेता देओल. दुसरी पत्नी हेमा मालिनीला धर्मेंद्रकडून दोन मुली आहेत. ईशा देओल आणि अहाना देओल.
धर्मेंद्रला १३ नातवंड आहेत...l Dharmendra has 13 grandchildren...
सनी देओल- दोन मुलं - करण देओल आणि राजवीर देओल.
बॉबी देओल - दोन मुलं - धर्म आणि आर्यमन देओल.
अजीता देओल- दोन मुली.
विजेता देओल - एक मुलगा आणि एक मुलगी.
ईशा देओल- दोन मुली - राध्या तख्तानी आणि मिराया तख्तानी.
आहाना देओल- डेरिन वोहरा (मुलगा). जुळ्या मुली - - अस्त्रिया वोहरा आणि आदिया वोहरा.
अशात विषय असा आहे की धर्मेंद्रच्या संपत्तीची वाटणी झाल्यानंतर त्यात सर्वाधिक हक्क कोणाचा असेल?
नक्की वाचा - Dharmendra Health Update : अभिनेता धर्मेंद्र यांची प्रकृती कशी आहे? निधनाबद्दलच्या वृत्ताचं सत्य आलं समोर
संपत्तीच्या वाटणीबद्दल कायदा काय सांगतो?
२०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा एक मुख्य निर्णय - रेवनसिद्दप्पा विरुद्ध मल्लिकार्जून (2023 INSC 783) या केसमुळे बऱ्याअंशी स्पष्टता आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय होता?
२०२३ च्या निर्णयानुसार, जर कोणा व्यक्तीचं दुसरं लग्न हिंदू विवाह कायद्यानुसार अमान्य मानलं जातं, त्यावेळी दुसऱ्या लग्नातून झालेली मुलं कायद्याच्या दृष्टीने वैध मानली जातील. ( धर्मेंच्या प्रकरणात, धर्मेंद्रची पहिली पत्नी प्रकाश कौर अद्यापही जीवंत आहे. धर्मेंद्रने हेमा मालिनीसोबत दुसरं लग्न केलं, मात्र त्याने पहिल्या पत्नीकडून घटस्फोट घेतला नाही.)
इशा आणि आहनाला हिस्सा मिळेल?
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की, दुसऱ्या लग्नापासून झालेल्या मुलांना वडिलांच्या स्वअर्जित आणि वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सा मिळू शकतो.
कायदेशीर भाषेत याला काल्पनिक विभाजन (Notional Partition) म्हटलं जातं. म्हणजे धर्मेंद्रनंतर त्यांची वडिलोपार्जित संपत्तीची वाटणी झाल्याचं मानलं जाईल आणि त्यातील जो हिस्सा धर्मेंद्रच्या नावावर असेल तोच भाग त्यांच्या सर्व वैध वारशांमध्ये समसमान विभागलं जाईल.
इशा देओल आणि आहना देओल यांची कायदेशीर स्थिती
वैधता - हेमा मालिनीसोबत दुसरं लग्न, हिंदू विवाह कायद्याअंतर्गत अमान्य मानलं जात असतानाही या कायद्याच्या कलम १६ (१) अंतर्गत धर्मेंद्रच्या मुलींना त्यांच्या आई-वडिलांच्या संबंधातून वैध मुलांचा दर्जा मिळतो. कायद्याचा हेतू त्या मुलांवरील कायदेशीर मुलांचा कलंक दूर करणं हा आहे.
सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा स्पष्ट केलं की, वैधतेचा हा दर्जा त्यांना मोठ्या हिंदू संयुक्त कुटुंबात भागीदार करीत नाही. त्यांचे अधिकार त्यांच्या पालकांच्या (धर्मेंद्र आणि हेमा मालिनी) मालमत्तेपुरते मर्यादित आहेत. त्यांच्या पालकांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीच्या मालमत्तेवर त्यांचा अधिकार नाही.
नक्की वाचा - Dharmendra : हॉटेलच्या रुममध्ये दिग्दर्शकाने अभिनेत्रीसोबत धर्मेंद्रला रंगेहात पकडलं; फोटोमुळे उडाली होती खळबळ
वडिलोपार्जित संपत्तीत वारसा हक्क
सर्वोच्च न्यायालयाने २०२३ च्या निर्णयाने एक स्पष्ट पद्धत सांगितलं आहे. बेकायदेशीर लग्नातून झालेल्या मुलांचा, आई-वडिलांच्या वडिलोपार्जित किंवा सहदायिक संपत्तीत अधिकार असू शकतो.
काल्पनिक वाटणी - हिंदू पुरुष सहदायिक (उदा. धर्मेंद्र) यांचा मृत्यू झाला, तर हिंदू विवाह कायद्याच्या कलम ६ (३) नुसार, मिताक्षरा सहदायिक संपत्तीची एक काल्पनिक वाटणी त्यांच्या मृत्यूच्या आधी झालेली असते.
हस्तांतरण - अशा प्रकारे संपत्तीची विभागणी, मृत्यूपत्राशिवाय उत्तराधिकाराअंतर्गत धर्मेंद्रच्या सर्व क्लास १ वारशांमध्ये होते.
अधिकारांवर निष्कर्ष - काल्पनिक वाटणीनंतर धर्मेंद्रच्या हक्काच्या संपत्तीत इशा देओल आणि आहना देओल यांना त्यांच्या दुसऱ्या क्लास १ वारस (उदा, त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर, त्यांची आई आणि पहिल्या लग्नातील मुलं, सनी, बॉबी, विजेता आणि अजीता) यांच्यासह समान वाटणीचा अधिकार असेल.
धर्मेंद्रच्या संपत्तीत कोणाकोणाला हक्क? l Who has rights to Dharmendra's property?
पहिली पत्नी प्रकाश कौर, त्यांची मुलं, सनी, बॉबी, विजेता आणि अजीता दुसरी पत्नी हेमा मालिनीच्या दोन्ही मुली - इशा आणि आहना देओल. या सर्वांमध्ये धर्मेंद्रच्या नावावरील संपत्ती समसमान वाटली जाईल.
पहिली पत्नी - प्रकाश कौर
पहिल्या पत्नीपासून मुलं - सनी देओल, बॉबी देओल, अजीता देओल आणि विजेता देओल
दुसऱ्या पत्नीपासूनच्या मुली - ईशा देओल आणि आहना देओल
या सर्व सहा मुलांमध्ये वडील धर्मेंद्रच्या संपत्तीत समसमान हक्क मिळेल.
हेमा मालिनीला मिळणार नाही प्रॉपर्टीत हिस्सा? l Hema Malini will not get a share in Dharmendra's property?
धर्मेंद्रच्या संपत्ती हेमा मालिनीला हिस्सा मिळणार नाही. कारण त्यांचं लग्न हिंदू विवाह कायद्याअंतर्गत वैध मानलं जात नाही. (धर्मेंद्रने दुसऱ्या लग्नावेळी घटस्फोट घेतला नव्हता अशी माहिती आहे). धर्मेंद्रने जर मृत्यूपत्र तयार केलं असेल आणि त्यात हेमा मालिनीला काही वाटा दिला असेल किंवा लग्नाची वैधता न्यायालयात सिद्ध केली तरच हेमा मालिनीला धर्मेंच्या संपत्तीत हक्क मिळेल.
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे ती, बेकायदेशीर लग्नातून जन्माला आलेली मुलांना कायदेशीर अधिकात संपत्तीत हक्क मिळेल. इशा आणि आहना देओल या दोघींना वडिलांच्या संपत्तीत समान हक्क मिळेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

