- व्हिडीओमध्ये एका महिलेने दिवा घराबाहेर ठेवल्याचं दिसलं
- हिंदू धर्मामध्ये निधनानंतर दिवा लावण्यामागील अर्थ काय
- हिंदू धर्मानुसार मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शांतीसाठी घराच्या दरवाज्यासमोर दिवा प्रज्वलित करण्याची परंपरा आहे
Dharmendra Death News: धर्मेंद्र यांच्या निधनाची माहिती समोर येण्यापूर्वीच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. व्हिडीओमध्ये एका महिलेच्या हातामध्ये प्रज्वलित केलेला दिवा दिसत आहे. घराबाहेरच्या एका कोपऱ्यात तिने तो दिवा ठेवला. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होऊ लागला की अशा प्रकारे घराबाहेर दिवा का ठेवला जातो? ही महिला नेमकी कोण होती, याबाबत माहिती समजू शकलेली नाही. पण हिंदू धर्मानुसार अशा प्रकारे दिवा लावण्यामागील महत्त्व नेमके काय आहे? याबाबत तज्ज्ञांकडून माहिती जाणून घेऊया..
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर दिवा का प्रज्वलित केला जातो?
घरामध्ये एखाद्या सदस्याचे निधन झाल्यानंतर घराच्या दरवाज्यासमोर दिवा लावण्यामागील परंपरेबाबतची माहिती अॅस्ट्रोलॉजर आर. के धाकरे यांनी दिलीय. अॅस्ट्रोलॉजर धाकरे म्हणाले की, "पितरांच्या शांतीसाठी दिवा प्रज्वलित केला जातो. तसेच मृत पावलेल्या व्यक्तीच्या पुढील प्रवासाच्या मार्गात त्यांना प्रकाश मिळेल आणि त्यांचा मार्ग सोपा होईल, अशी मान्यता आहे. हा दिवा किंवा प्रकाश त्यांना पुढील मार्गासाठी मार्गदर्शन करतो. 13 दिवस ही प्रथा पाळली जाते, रोज एक दिवा प्रज्वलित केला जातो. दरम्यान प्रत्येक ठिकाणानुसार वेगवेगळ्या पद्धतीने ही प्रथा पाळली जाते".
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)