जाहिरात

Dharmendra: धर्मेंद्र-हेमा लग्नानंतरही एकत्र का नव्हते? कोणालाही असं राहायला आवडणार नाही, ड्रीम गर्लनं उघडपणे

Actor Dharmendra And Hema Malini: धर्मेंद्र यांनी वर्ष 1980 रोजी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं होतं. त्यावेळेस पहिल्या लग्नापासून त्यांना चार मुलंही होती. पण लग्न केल्यानंतरही हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्यासोबत का राहिल्या नाहीत?

Dharmendra: धर्मेंद्र-हेमा लग्नानंतरही एकत्र का नव्हते? कोणालाही असं राहायला आवडणार नाही, ड्रीम गर्लनं उघडपणे
"Actor Dharmendra And Hema Malini: लग्न केल्यानंतरही धर्मेंद्र आणि हेमा मालिनी वेगळे का राहत होते?"
Hema Malini Instagram
  • धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी 1980मध्ये लग्न केले
  • लग्नानंतर हेमा मालिनींनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला
  • धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची अनोखी प्रेमकहाणी
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Actor Dharmendra And Hema Malini: बॉलिवूडचे सुपरस्टार धर्मेंद्र यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन झालं. 24 नोव्हेंबर रोजी त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीय. यादरम्यान चाहतेमंडळी त्याचे बॉलिवूडमधील योगदानाच्या आठवणींना उजाळा देत आहेत तर सोशल मीडियावर त्यांच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टीही व्हायरल होत आहे. अभिनय क्षेत्रातील त्यांचा प्रवास प्रेरणादायी होताच पण दुसरीकडे धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची प्रेमकहाणीही चाहत्यांच्या कायम आठवणीत राहील.

विवाहित तसेच चार मुलं असतानाही धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी वर्ष 1980 रोजी लग्न केले होते. लग्न केल्यानंतरही हेमा मालिनी आणि धर्मेंद्र एकत्र राहत नव्हते, हेमा यांनी हा निर्णय का घेतला, त्यांचं काय मत होतं? जाणून घेऊया माहिती... 

1. हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यापासून विभक्त राहण्याचा निर्णय का घेतला?  

हेमा मालिनी यांनी त्यांचे आत्मचरित्र "हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल"मध्ये या कठीण निर्णयाबाबत उघडपणे माहिती दिली होती. याद्वारे त्यांच्यातील महानता आणि इतरांप्रति असलेला आदर दिसून येतो. 

इतरांचा आदर: हेमा मालिनी यांनी स्पष्ट म्हटलं होतं की, "मला कोणालाही त्रास द्यायचा नव्हता." त्यांचा हा निर्णय धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर आणि त्यांच्या मुलांप्रति असलेला आदर तसेच नात्यातील मर्यादा दर्शवतात.

समाधान आणि आनंद: "धरमजींनी माझ्यासाठी आणि माझ्या मुलींसाठी जे काही केले आहे, त्याबाबत मी आनंदी आहे", असेही त्यांनी म्हटलं.  कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारे गोंधळ निर्माण करण्याऐवजी त्यांनी शांतता आणि आनंदाचा मार्ग निवडला. 

2. लोकांच्या टोमण्यांवर ड्रीम गर्लचं उत्तर

जेव्हा धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या नात्याबाबत लोकांना माहिती समजली, तेव्हा समाजाने बऱ्याच टीका केल्या. लोकांनी बोल लावून त्यांचा उल्लेख 'दुसरी बाई' असा केला.

आरोप आणि चर्चा: हेमाजींनी परिस्थिती स्वीकारली होती. त्या म्हणायच्या, "लोक माझ्यावर आरोप करायचे, मला माहिती होतं लोक माझ्या पाठीमागे चर्चा करायचे".

आनंद निवडला: या सर्व गोष्टी असतानाही हेमा मालिनींनी या नकारात्मक गोष्टींना महत्त्व दिलं नाही. त्या म्हणाल्या,"मला फक्त एवढेच माहिती होते की ते (धर्मेंद्र) मला आनंदी ठेवत आहेत आणि मला फक्त आनंदी राहायचं होतं". त्यामुळे त्यांनी टीकेकडे दुर्लक्ष करुन स्वतःच्या आनंदाला प्राधान्य दिले.

3. नात्यातील स्वातंत्र्य

हेमा मालिनी यांनी त्यांच्या लग्नाबद्दल स्पष्टपणे मत मांडले, या लग्नामुळे त्या एकट्या पडल्या आहेत, ही धारणाही त्यांनी फेटाळून लावली.

नात्यातील स्वातंत्र्य: "मी पोलीस अधिकारी नाही, जे प्रत्येक वेळेस त्यांच्यावर नजर ठेवेन. धर्मेंद्र मला किती दिवस भेटण्यासाठी येतात, याचं लोकांसमोर प्रदर्शन मांडण्याची आवश्यकता नाहीय",असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं होतं.

वडिलांचे कर्तव्य: हेमा मालिनींना धर्मेंद्र यांच्या कर्तव्यांवर विश्वास होता. वडील म्हणून धर्मेंद्र यांना त्यांचे कर्तव्य माहिती आहे आणि मला त्याबाबत कधीही आठवणी करून द्यावी लागली नाही, असेही हेमा मालिनींनी सांगितलं. याद्वारे त्यांचे नातं विश्वास आणि सन्मानावर आधारित होते, हे दिसतं.

4. जीवनातील परिस्थिती स्वीकारणे

लेहरे रेट्रोशी (Lehren Retro) बातचित करताना हेमा मालिनींनी त्यांच्या लग्नाबाबत पुन्हा एकदा चर्चा केली होती. 

परिस्थिती स्वीकारणे: कोणालाही असं राहायला आवडणार नाही, पण जे घडतं ते तुम्हाला स्वीकारावं लागतं, असे त्यांनी म्हटलं होतं.

समाधानी जीवन: जीवनात घडलेल्या या गोष्टीमुळे त्या नाराज नव्हत्या. मी खूश आहे, मला दोन मुली आहेत आणि त्यांचं चांगलं संगोपन केलंय, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. 

Actor Dharmendra Photo Viral: धर्मेंद्र-प्रकाश कौर आणि हेमा मालिनींचा तो दुर्मीळ फोटो, पहिल्यांदाच दोन्ही पत्नींसोबत एकत्र दिसले ही-मॅन

(नक्की वाचा: Actor Dharmendra Photo Viral: धर्मेंद्र-प्रकाश कौर आणि हेमा मालिनींचा तो दुर्मीळ फोटो, पहिल्यांदाच दोन्ही पत्नींसोबत एकत्र दिसले ही-मॅन)

5. सन्मान आणि समजूतदारपणाचे नाते 

हेमा मालिनी लग्नानंतरही वेगळ्या का राहिल्या, याचे उत्तर एका शब्दांत सांगायचं झालं तर मर्यादा...  

Actor Dharmendra Passes Away: धर्मेंद्र पंचत्वात विलीन! मुलगा सनी देओलने दिला मुखाग्नी

(नक्की वाचा: Actor Dharmendra Passes Away: धर्मेंद्र पंचत्वात विलीन! मुलगा सनी देओलने दिला मुखाग्नी)

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची प्रेमकथा 

नाते केवळ एकत्र राहिल्यानं निर्माण होत नाही, तर विश्वास, समजूतदारपणा आणि दुसऱ्यांच्या भावनांचा आदर केल्यानं नाती टिकतात; असा संदेश धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या प्रेमकथेतून मिळतो. हेमा मालिनी यांनी स्वतःच्या आनंदासह धर्मेंद्र यांच्या पहिल्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेची पूर्णपणे काळजी घेतली होती. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com