Padma Bhushan Award: देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार 'पद्म पुरस्कार-2024' चे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सोमवारी (22 एप्रिल) करण्यात झाले. यामध्ये महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी 'पद्म पुरस्कार' (Padm Purskar 2024) प्रदान करण्यात आले आहेत. यामध्ये माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू (M Venkaiah Naidu), ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला बाली (Vyjayanthimala Bali), ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty), ज्येष्ठ गायिका उषा उत्थप (Usha Uthap) या मान्यवरांचा समावेश आहे. तसेच प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक (Bindeshwar Pathak) यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
(नक्की वाचा: 18 वर्षांपूर्वी आमीर खानच्या मुलाची साकारली भूमिका, आता इतका हँडसम दिसतोय हा मुलगा)
ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये उत्कृष्ट योगदानासाठी पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सोमवारी राजधानी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मिथुन चक्रवर्तींची प्रतिक्रिया
हिंदी सिनेमांमध्ये आपल्या अतुलनीय योगदान देण्यासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी पद्म भूषण स्वीकारल्यानंतर सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत. मिथुन चक्रवर्ती यांनी ANIशी बातचित करताना म्हटले की,"मी खूप खूश आहे. मी आपल्या जीवनामध्ये कधीही कोणाकडूनही काहीही मागितले नाही. मी खूप आनंदी आहे कारण जेव्हा एखाद्याला अशा प्रकारे सन्मान मिळतो, तो क्षण सर्वात आनंदाचा असतो".
(नक्की वाचा: अब मेरा समय आया है!...Kalki 2898 ADच्या टीझरसह अमिताभ बच्चन यांचा लुक चर्चेत)
"...मी अपेक्षाच केली नव्हती"
पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे वृत्त मिळाले, त्या क्षणांच्या आठवणींना उजाळा देत मिथुन चक्रवर्ती म्हणाले की," मला पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे, असे वृत्त सांगणारा फोन जेव्हा मला आला. तेव्हा मिनिटभरासाठी मी शांत झालो, कारण मला याची अपेक्षाच नव्हती. ही फार मोठी बाब आहे, पण मला याची अपेक्षा नव्हती. मी खूश आहे. माझी निवड करणाऱ्या समितीतील सर्व लोकांचे धन्यवाद"
(नक्की वाचा: राम नाईक, राजदत्तंसह महाराष्ट्रातील पाच जणांना ‘पद्म पुरस्कार' प्रदान)
माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण- उषा उत्थप
उषा उत्थप यांनी देखील ANI या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना म्हटले की, "मी खूप आनंदी आहे. माझ्या डोळ्यात आपण अश्रू पाहू शकता. हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण आहे. आपल्या देशाकडून आणि सरकारकडून आपले कौतुक होणे, याहून अधिक काय हवे आहे?"
पुरस्काराच्या महत्त्वाबाबत सांगताना ज्येष्ठ गायिका उषा म्हणाल्या की, "मी खूप खूश आहे. तुम्ही शास्त्रीय गायक किंवा शास्त्रीय नृत्यांगणा असाल तर पुरस्कार मिळणे स्वाभाविक आहे. पण आमच्यासारख्या लोकांसाठी, कारण आम्ही सामान्य लोक आहोत; त्यामुळे पद्म पुरस्कारासाठी निवड होणे ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण मी केवळ शांतता आणि बंधुत्वावर विश्वास ठेवते तसेच एकतेच्या शक्तीवर विश्वास आहे. आपण एकमेकांसाठी काहीतरी करू शकतो. संगीताच्या माध्यमातून लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतो. मला केवळ यातच स्वारस्य आहे".
राष्ट्रपती भवनातील शानदार समारंभामध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.