Pushkar Jog Comment On Marathi Film Industry : ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी काही दिवसांपूर्वी मराठी सिनेमांच्या बजेटसंदर्भात परखड मत व्यक्त केले होते. किमान 35 कोटी रुपये बजेटचा सिनेमा तयार केला तरच मराठी सिनेमांची परिस्थिती बदलेल, असे विधान मांजरेकर यांनी केले होते. यानंतर आता आणखी एक अभिनेता मराठी सिनेमांसह इंडस्ट्रीबाबतही रोखठोकपणे व्यक्त झाला आहे. अभिनेता पुष्कर जोगने एका मुलाखतीदरम्यान इंडस्ट्रीमध्ये काम करताना त्याला आलेले अनुभव थेट मांडले आहेत. सोशल मीडियावर त्याने मुलाखतीचा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुष्कर जोगने नेमके काय-काय म्हटलंय?
पुष्कर जोगचा रोख कोणाकडे?
"चार वर्ष मी घरात बसून होतो. काही लोकांनी बिझनेसमध्ये मला फसवलं. पाच एक कोटी रुपयांचं कर्ज माझ्यावर आलं. सिनेमा हा कायम माझा आवडीचा विषय. इथे जेव्हा मी काम शोधायला लागलो, मला ते जाणवलं... अरे इथे तर खूप मोठे लॉबिंग आहे. इंडस्ट्रीमध्ये त्यांचे जे ग्रुप्स आहेत ते त्यांनाच काम देत आहेत. त्यांनाही माहिती आहे मी कोणाबाबत बोलतोय", असे पुष्करने थेट म्हटलंय.
(नक्की वाचा: Mumbai News: 'आपणच आपली ठासून घेतो...', मराठी अभिनेता भयंकर संतापला; VIDEO व्हायरल)
"आम्हाला शहाणपण शिकवू नका"
नॉन मराठी जे लोक आहेत, त्यांनी इथे येऊन आम्हालाच शहाणपण शिकवू नका. आम्ही मुंबईत राहायचं, महाराष्ट्रात राहायचं आणि आम्हीच आमच्या शोसाठी भिक मागायची. जे मराठी-मराठी करतात ना तेच लॉबिंग जास्त करतात, असेही पुष्करने मुलाखतीत सांगितले.
पुष्करने खंत केली व्यक्त
राजा मौली सर ऑस्करमध्ये जातात आणि म्हणतात 'RRR' हा तेलुगू सिनेमा आहे. मलाही म्हणायचंय तिथे जाऊन ही माझी मराठी फिल्म आहे, ते फिलिंग आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये नाहीय, असे म्हणत त्यानं खंतही व्यक्त केलीय.
(नक्की वाचा: हे धाडस केले तरच मराठी सिनेमांची स्थिती बदलेल, महेश मांजरेकरांचे परखड मत)
पुष्करने केली ही विनंती
पुष्कर पुढेअसंही म्हणाला की, "पाच कोटी रुपयांचे बजेट असते, सिनेमा दोन कोटी रुपयांमध्ये करतात आणि तीन कोटी खिशात जातात. लोकांचे फिल्म रिलीजसाठी पडून आहेत, कारण सगळे तुम्ही घरी नेलं, तुमची घरं बनली. डिस्ट्रिब्युशनसाठी सरकार बरेच काही करू शकते, जे ते नाही करतंय"
मुलाखतीचा व्हिडीओ पुष्करने इन्स्टाग्रामवर शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की, "मुळात मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात मराठी माणसाला/ मराठी चित्रपटांना किंमत नाही राहिलेली.अतिशय दुर्दैवी… बाहेरचे लोक येऊन मराठी फिल्म्स प्रोड्युसर्सना सांगणार की ही फिल्म आम्ही विकत घेणार की नाही. अजिबात एकी नाहीये. प्रचंड jealousy... मराठी पाऊल कायमच पुढे राहू दे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना… #jogbolnaar सहमत ???"
पुष्करने थेट मांडलेल्या गोष्टींबाबत युजर्सकडून त्याचे कौतुक केले जात आहे. अनेकांनी त्याच्या मताशी सहमत असल्याचेही म्हटलंय.
Photo Credit: Pushkar Jog Instagram
Photo Credit: Pushkar Jog Instagram