मराठी चित्रपटसृष्टीला वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणारे दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांचे अनेक किस्से आपण आतापर्यंत त्यांच्यात तोंडून ऐकले आहे. त्यांचे हे किस्से सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. दरम्यान सचिन पिळगावकरांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Sachin Pilgaonkar troll)
एका रेडिओला मुलाखत देताना सचिन पिळगावकरांनी हा किस्सा शेअर केला आहे. हा किस्सा 1963 साली प्रदर्शित झालेल्या हा माझा मार्ग एकला... या चित्रपटासंबंधित आहे. राजा परांजपे दिग्दर्शित हा चित्रपट 1963 साली प्रदर्शित झाला होता. त्या काळी या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलं होतं. या चित्रपटात शरद तळवलकर, सीमा देव, राजा परांजपे, राजा पटवर्धन आणि जीवनकला यांनी भूमिका साकारली आहे. याशिवाय रिमा लागू यांनी बालकलाकाराची भूमिका साकारली आहे. त्या चित्रपटादरम्यान सचिन पिळगावकर (जन्म 1957) अवघे सात वर्षांचे होते.
नक्की वाचा - Raju Kalakar: 'दिल पे चलाई छुरियां' फेम राजू कलाकारची लॉटरी लागली! सोनू निगमची मोठी घोषणा, पाहा VIDEO
संजीव कुमारांनी घेतला सचिन पिळगावकरांचा ऑटोग्राफ... (Sachin Pilgaonkar Sanjeev Kumar Video)
या मुलाखतीदरम्यान सचिनने सांगितलं की, अभिनेते संजीव कुमार हे माझा चित्रपट 'हा माझा मार्ग एकला...' पाहण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी सहकाऱ्याला माझा पत्ता विचारला. घरी येण्यापूर्वी सांताक्रुझमधील एका स्टेशनरीच्या दुकानात गाडी थांबली, तेथून ऑटोग्राफ बुक घेतली. घरी आल्यानंतर संजीव कुमार म्हणाले, मी आतापर्यंत कधीच कोणाचा ऑटोग्राफ घेतलेला नाही. मी आताच तुझा 'हा माझा मार्ग एकला..' चित्रपट पाहून आलोय. तू मला ऑटोग्राफ दे म्हणत माझ्यापुढे ऑटोग्राफ बुक ठेवल्याचं सचिन पिळगावकरांनी सांगितलं. वयाच्या सातव्या वर्षी सचिन पिळगावकरांची चित्रपटातील भूमिका पाहून द ग्रेट संजीव कुमार इतके प्रभावित झाले की, त्यांनी स्वत: सचिनच्या घरी जाऊन त्याचा ऑटोग्राफ घेतला, असा सचिन पिळगावकरांचा दावा आहे.
सचिन पिळगावकर पुन्हा ट्रोल...
सचिन पिळगावकरांनी असा काही दावा केल्यानंतर ते सोशल मीडियावर व्हायरल होतात हे निश्चित. तसंत या व्हिडिओनंतरही सचिन पिळगावकर पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांच्या या व्हिडिओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिलंय, अशोक सराफ, अमिताभ बच्चन, धर्मेन्द्र, सिप्पी वगैरेंच्या मृत्यूनंतर आणखी काही खुलासे होतील महागुरूंकडून. तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिलंय, दरवेळी गीतेवर हात ठेवून जे सांगेल खरं सांगेल अशी शपथ घेऊन इंटरव्हूला बसवा महागूरूंना.