जाहिरात

Raju Kalakar: 'दिल पे चलाई छुरियां' फेम राजू कलाकारची लॉटरी लागली! सोनू निगमची मोठी घोषणा, पाहा VIDEO

Sonu Nigam with internet sensation Raju Kalakar: या गाण्याने खुद्द सोनू निगमलाही भुरळ घातली आहे. अलिकडेच सोनू निगमने राजू कलाकारची भेट घेत मोठी घोषणा केली आहे.

Raju Kalakar: 'दिल पे चलाई छुरियां' फेम राजू कलाकारची लॉटरी लागली! सोनू निगमची मोठी घोषणा, पाहा VIDEO

Sonu Nigam collaborates With Raju Kalakar: सोशल मीडियावर सध्या  'दिल पे चलाईं छुरियां' हे गाणे तुफान व्हायरल होत आहे. 'राजू कलाकार' नावाच्या तरुणाने हटके स्टाईलमध्ये गायलेल्या या गाण्याने नेटकऱ्यांना अक्षरशः वेड लावले आहे. असंख्य  रीलस्टारने हा ट्रेंड फॉलो करत व्हिडिओ बनवलेत. राजू कलाकारने दोन दगड वाजवत हे गाणे म्हटले होते जे नेटकऱ्यांना प्रचंड आवडले. आता या गाण्याने खुद्द सोनू निगमलाही भुरळ घातली आहे. अलिकडेच सोनू निगमने राजू कलाकारची भेट घेत मोठी घोषणा केली आहे.

Viral Video : दोन दगड वाजवण्याचा ट्रेंडचा इंटनेटवर धुमाकूळ 'दिल पे चलाई छुरियां' गाणारा राजू कलाकार कोण आहे?

1995 मध्ये 'बेवफा सनम' चित्रपटात सोनू निगमने हे गाणे गायले होते, पण ३० वर्षांनंतर राजू भट्ट उर्फ राजू कलाकारच्या हटके स्टाईलमुळे या गाण्याने पुन्हा सर्वांना वेड लावले. राजू कलाकरने दगडाचे दोन तुटलेले तुकडे हातात घेऊन वाद्य वाजवत हे गाणे गायले जे रातोरात प्रसिद्ध झाले. या गाण्याची क्रेझ इतकी झालीय की मूळ गायक सोनू निगमही त्याच्यावर फिदा झाला आहे. अलिकडेच सोनू निगमनेही त्याची भेट घेत एक खास व्हिडिओही शेअर केला. 

या व्हिडिओमध्ये, सोनू निगम आणि राजू कलाकर दोघेही 'दिल पे चलये चुरियां' हे गाणे एकत्र गात आहेत. सोनू निगम त्या दोन दगडाचे तुकडे वाजवून संगीत देखील तयार करतो, जे सोनू कलाकर वाजवतो. हा व्हिडिओ टी-सीरीजच्या भागीदारीत बनवण्यात आला आहे. तसेच सोनू निगमने संकेत दिले आहेत की तो आणि राजू कलाकर लवकरच या गाण्याचे नवीन व्हर्जन सर्वांसमोर आणणार आहेत.

सोनू निगमने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर राजू कलाकरसोबत गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, 'तू ते गुणगुणत आहेस. आता पूर्वीसारखे ऐकण्यासाठी तयार राहा. या सोमवारी काहीतरी खास येणार आहे.' हे ऐकून चाहते खूप आनंदी झाले आहेत. नेटकऱ्यांनीही त्याचे कौतुक केले आहे. अनेक नेटकऱ्यांनी राजू कलाकारची लॉटरी लागली असंही म्हटलं आहे. 
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com