
Shantanu Moghe Post : 31 ऑगस्ट 2025 रोजी मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिचं वयाच्या 38 व्या वर्षी कॅन्सरच्या (Priya Marathe's death) उपचारादरम्यान निधन झालं. तिने अचानक घेतलेल्या एग्झिटमुळे चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. त्यातही प्रियाचा पती अभिनेता शंतनू मोघे याच्यावर किती मोठं संकट कोसळलं असेल याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. नवं घर घेतलं होतं, दोघांचा सुखाचा संसार सुरू होतं, करिअरच्या एका मोठ्या टप्पा गाठला होता, अशा परिस्थितीत प्रिया त्याचा साथ सोडून कायमची निघून गेली. हे दु:ख कधीही न भरून निघणारं आहे. गेल्या महिनाभरात तो सोशल मीडियावर काहीच बोलला नाही. अखेर आज प्रियाच्या निधनाच्या महिनाभरानंतर शंतनू मोघे याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने आपलं मन हलकं केलं आहे. (Shantanu Moghe's first post after Priya Marathe's death)
शंतून मोघेने मानले आभार... (Shantanu Moghe Social media Post)
प्रियाच्या निधनानंतर ज्यांनी ई-मेल, वॉट्सअॅप, एक्स, इंस्टाग्राम, फेसबुक आणि लाईक्स सारख्या वेगवेगळ्या संभाषणाच्या प्लॅटफॉर्मचा वापर करून आपलं प्रेम आणि आशीर्वाद व्यक्त केले त्यांचा मी आभारी आहे. प्रिया मराठेसाठी ज्यांनी आपल्या भावना इतक्या उत्कटतेने व्यक्त केल्या अशा सर्वांचे, कुटुंबाचे, मित्रांचे, चाहत्यांचे, ओळखी आणि अनोळखींचे, खूप खूप आभार. तुम्ही पाठिशी उभे राहिलात यामुळे मानवतेवरील आमचा विश्वास पुन्हा जागृत झाला. देव तुमचे भले करो. प्रियाला जाऊन आज एक महिना झाला. माझं वैयक्तिक दुःख शब्दात व्यक्त करता येणार नाही.
इतक्या प्रेमळ, सकारात्मक, शुद्ध आत्म्यानं अकाली घेतलेल्या निरोपाने मी खचून गेलो होतो. पण प्रियाने केलेलं काम, कला, प्रेम, काळजी, दयाळूपणा, आचरण आणि आपल्या कृतीतून असंख्या लोकांच्या हृदयाला स्पर्ध केला होता. जे आमच्या पाठिशी उभे राहिले त्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार.
बायकोसाठी थेट देवालाच भरला दम, शंतनुचे भावुक करणारे शब्द...
आपल्या पोस्टच्या शेवटी शंतनुने थेट देवालाच दम भरला आहे. देवा, प्रियाची काळजी घेण्यात, तिला प्रेम करण्यात आता एकही चूक खपवून घेतली जाणार नाही. आम्ही पुन्हा भेटेपर्यंत तिची काळजी घे... माझी एँजल...
शंतनु मोघेच्या पोस्टवर अनेकांनी व्यक्त केल्या भावना...
शंतनुच्या पोस्टवर अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने कमेंट केली आहे. तिची दररोज आठवण येते असं तिने यात लिहिलं आहे.
अभिनेत्री संयोगिता भावे - देवाने प्रियाची अत्यंत चांगली काळजी घ्यायलाच हवी. भावना खूप चांगल्या प्रकारे व्यक्त केल्या. हे दु:ख पचवायला तुला शक्ती मिळो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world