जाहिरात

Sonali Sood Accident:मोठी दुर्घटना! सोनू सूदच्या पत्नीचा भीषण अपघात, रुग्णालयात उपचार सुरु

Sonu Sood Wife Accident: दोघांनाही 48 ते 72 तास निरीक्षणाखाली ठेवले जाईल. सोनू सूदला अपघाताची माहिती मिळताच तो ताबडतोब त्याच्या पत्नीकडे पोहोचला.

Sonali Sood Accident:मोठी दुर्घटना! सोनू सूदच्या पत्नीचा भीषण अपघात, रुग्णालयात उपचार सुरु

नागपूर: बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या कुटुंबियांचा अपघात झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. सोनू सूदची पत्नी सोनाली सूदचा मुंबई- नागपूर महामार्गावर मध्यरात्री अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात सोनू सूदची पत्नी जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद याच्या पत्नीच्या गाडीचा मोठा अपघात झाला आहे. सोमवारी रात्री ही दुर्घटना घडली. सोनू सूदची पत्नी सोनाली सूद तिची बहीण आणि भाच्यासोबत मुंबई नागपूर हायवेवरुन प्रवास करत होती. याचवेळी रात्रीच्या सुमारास तिच्या गाडीचा मोठा अपघात झाला.

अपघातानंतर सोनाली सूदला उपचारासाठी मॅक्स हॅास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत सोनाली सूदसह तिचा भाचाही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांवरही नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघांनाही 48 ते 72 तास निरीक्षणाखाली ठेवले जाईल. सोनू सूदला अपघाताची माहिती मिळताच तो ताबडतोब त्याच्या पत्नीकडे पोहोचला आणि काल रात्रीपासून तो नागपूरमध्ये आहे. 

(नक्की वाचा- जयकुमार गोरे ब्लॅकमेलिंग प्रकरणात सुप्रिया सुळे, रोहित पवारांचं नाव; CM देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट)

दरम्यान, सोनू सूदची प्रेमकहाणी नागपूरमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना सुरू झाली, जिथे त्याची भेट एमबीएचे शिक्षण घेत असलेल्या सोनालीशी झाली. चित्रपटात येण्यापूर्वी सुरू झालेली ही प्रेमकहाणी पुढे चालू राहिली आणि दोघांनीही दीर्घ डेटिंगनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांचेही लग्न 25 सप्टेंबर 1996 रोजी झाले. सोनू सूद आणि सोनाली आता दोन मुलांचे पालक आहेत. सोनालीला प्रसिद्धीपासून दूर राहणे आवडते आणि ती क्वचितच कोणत्याही कार्यक्रमात किंवा पार्ट्यांमध्ये दिसते.

Viral Video: वाचवा, वाचवा... अभिनेता स्वप्नील जोशीचा मदतीसाठी धावा; असं काय घडलं? पाहा VIDEO

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: