Gautami Kapoor Shocking News : पॉप्युलर टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेते राम कपूर यांच्या पत्नी आणि ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड'फेम अभिनेत्री गौतमी कपूरची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. गौतमीनं खळबळजनक विधान केल्यानं ती इंटरनेटवर ट्रोल होत आहे. मुलगी सियाला सेक्स टॉय गिफ्ट करणार, असं गौतमीने म्हटलं होतं. गौतमीच्या असभ्य प्रतिक्रियेमुळं नेटकऱ्यांचा संताप उडाला आहे. पालक म्हणून बेताल वक्तव्य केल्यानं गौतमीवर लोक प्रचंड चिडले आहेत. यावर गौतमीने खुलासा करत म्हटलंय की,नकारात्मक कमेंट्समुळे त्या नैराश्यात गेल्या होत्या आणि भावनिकदृष्ट्या थकल्या होत्या.
गौतमी कपूरने नेमकं काय म्हटलं?
माध्यमांशी बोलताना गौतमी कपूर म्हणाली, हे अचानक घडले. साडेचार महिन्यांपूर्वी मी पॉडकास्ट केला होता. पण काही महिन्यांनंतर मी एका मोठ्या वादात सापडली. यामागचं कारण मला स्वतःलाही माहित नाही. मी कोणतीही सामान्य टिप्पणी केली नव्हती आणि मी असेही म्हटले नव्हते की प्रत्येक आईने असे करावे. ही एक गोष्ट होती, जी मी त्या खास दिवशी करत होते. मी माझ्या मुलाबद्दल, माझ्या मुलीबद्दल काहीतरी म्हटले होते. हे माझं तिच्यासोबतचं नातं आहे, मग मला हे का योग्य ठरवावे लागते?"
नक्की वाचा >> Kangana Ranaut: खरा 'धुरंधर' कोण? Dhurandhar पाहिल्यानंतर कंगणा रणौत भडकली, 2 शब्दातच सांगितलं
"जर समाजातील एखाद्या विशिष्ट वर्गाला ही गोष्ट आवडली नाही, तर मला त्याबाबत काहीच अडचण नाही. त्यांनी माझ्या मतांशी सहमत व्हावे की नाही, हे मी त्यांना सांगत नाहीय. मी हे एक सत्य म्हणून सांगितले होते, ज्यावर मी खरोखर विश्वास ठेवते. राम आणि माझे मुलांसोबत खूप खुले नाते आहे. काही लोक याला मान्यता देतील, तर काहींना हे चुकीचे वाटेल. ती त्यांची मते आहेत आणि मी अशी व्यक्ती नाही जी त्यांना जज करेल. त्यांना त्यांची मते मांडण्याचा अधिकार आहे. जसं मला माझी मते मांडण्याचा अधिकार आहे. मग तुम्ही माझ्या मुलांना या वादात का ओढत आहात?"
नक्की वाचा >> 100 रुपयांत विकले जातात कपलचे प्रायव्हेट व्हिडीओ, दलालांचा अवैध धंदा, Telegram वर व्हिडीओ लीक
ट्रोलिंगचा काय झाला परिणाम?
ट्रोलिंगमुळे मानसिक आरोग्यावर झालेल्या परिणामाबद्दल बोलताना गौतमी कपूर म्हणाली, "मी एक प्रकारे डिप्रेशनमध्ये गेले होते. मी जेव्हा माझं इन्स्टाग्रामवर फीड पाहिलं, तेव्हा लोकांनी कशाप्रकारे कमेंट्स केल्या, यावर तुम्ही विश्वासच ठेवणार नाही. मी कल्पनाही करू शकत नव्हते की लोक खरोखर दुसऱ्या स्त्रीला, दुसऱ्या व्यक्तीबाब अशा गोष्टी लिहू शकतात. मी जवळपास एक महिन्यासाठी इंस्टाग्रामवरून गायब झाले होते."