Kangna Ranaut On Dhurandhar : आदित्य धर दिग्दर्शीत ‘धुरंधर' चित्रपटाचा 15 व्या दिवशीही बोलबाला आहे. या चित्रपटाने देशांतर्गत स्तरावर 503 कोटींची कमाई केली आहे. तर जागतिक स्तरावर हा आकडा 700 कोटींच्या पार गेला आहे. धुरंधर प्रदर्शीत झाल्यापासून तमाम प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईतच बनला आहे. या चित्रपटाबाबत दिग्गज सेलिब्रिटींनीही मोठ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतनेही धुरंधर पाहिल्यानंतर महत्त्वाची प्रतिक्रिया दिलीय. कंगनाने या चित्रपटावर स्तुतीसुमने उधळतानाच दिग्दर्शक आदित्य धर यांचंही कौतुक केलं आहे. कंगनाने या चित्रपटाला ‘मास्टरपीस' असे संबोधले आहे. कंगनाने इन्स्टाग्राम पोस्टवर नेमकं काय म्हटलं आहे? वाचा सविस्तर.
कंगना रणौतने इन्स्टाग्रामवर काय म्हटलंय?
कंगनाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटलंय, "मी ‘धुरंधर' पाहिला आणि चित्रपट पाहताना खूप मजा आली,पण हा साधा चित्रपट नाही,मास्टरपीस आहे. चित्रपट निर्मात्यांचा खूप सन्मान राखला पाहिजे. चित्रपट पाहून मस्त वाटलं.सर्वांना खूप शुभेच्छा.सर्वांनी चित्रपटात उत्तम काम केले आहे,पण खरे धुरंधर आदित्य धर आहेत. सीमेवर आपले सैनिक, सरकारमध्ये मोदीजी आणि बॉलिवूड सिनमेता तुम्ही..पाकिस्तानी दशतवाद्यांची खूप धुलाई करा."

नक्की वाचा >> WhatsApp उघडण्याआधी 'हे' आताच वाचा, GhostPairing मुळे तुमचं अकाऊंट होणार हॅक, 'या' सेटिंग्ज बदला
‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक'हा पहिला चित्रपट
आदित्य धर देशभक्तीवर आधारित चित्रपटांसाठी ओळखले जातात.‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक'हा त्यांच्या पहिला चित्रपट होता. ज्यामुळे विक्की कौशल आणि आदित्य धर यांच्या करिअर अधिक मजबूत झालं. त्यानंतर त्यांनी ‘आर्टिकल 370' आणि ‘बारामुल्ला'सारखे चित्रपट केले. मात्र त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट मायथॉलॉजिकल ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा' अजूनही नावाजलेला नाहीय. 2021 मध्ये या चित्रपटाची घोषणा झाली होती, पण बजेट इतके मोठे होते की चित्रपट अद्याप सुरू होऊ शकला नाही. हा चित्रपट महाभारतातील द्रोणाचार्यांचा पुत्र आणि योद्धा अश्वत्थामाच्या मुक्ती आणि अमरत्वाच्या कथेवर आधारित होता. पण 2021 पासून आजपर्यंत या चित्रपटाबद्दल कोणतेही अपडेट आलेले नाही.
नक्की वाचा >> Viral Video: "आता तू बघच..", रात्रीच्या प्रवासादरम्यान Rapido ड्रायव्हरने महिलेसोबत केलं घाणेरडं कृत्य
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world