जाहिरात
Story ProgressBack

अभिनेत्री हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान; सोशल मीडियावर दिली माहिती

Hina Khan Diagnosed third stage breast cancer : हिना खान हिंदी टेलिव्हिजन इंडयेस्ट्रीमधील मोठं नाव आहे. ' रिश्ता क्या कहलात है'मधील अक्षरा या भूमिकेतून हिना घराघरात पोहोचली.

Read Time: 2 mins
अभिनेत्री हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान; सोशल मीडियावर दिली माहिती

टेलिव्हिजन स्टार हिना खान हिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं निदान झालं आहे. हिना खानला झालेला कॅन्सर तिसऱ्या स्टेजमध्ये आहे. हिना खानने स्वत: सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर तिने सविस्तर पोस्ट लिहून याबाबत माहिती दिली.

या आजारावर मात करण्याचा मी निश्चय केला आहे आणि कठोर परिश्रम घेत आहे, तिने म्हटलं आहे. हिना खानने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, "माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि काळजी घेणाऱ्या सर्व लोकांसोबत एक महत्त्वाची माहिती शेअर करायची आहे. मला स्टेज थ्री ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. या आजारावर मात करण्यासाठी मी दृढनिश्च केला आहे. मी पूर्णपणे बरी आहे. या आजारावर उपचार सुरु केले आहे. यातून आणखी मजबूत होण्यासाठी मी जे काही आवश्यक आहे ते करण्यास तयार आहे."

(नक्की वाचा- महाराज सिनेमासाठी अभिनेत्याचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, 5 महिन्यांत घटवले 26 किलो वजन))

"या काळात मला प्रायव्हसी देण्याचं आवाहन करते. तुमचे प्रेम आणि आशीर्वादासाठी मी मनापासून आभारी आहे. या प्रवासात तुमचे वैयक्तिक अनुभव,  सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरतील. मला खात्री आहे की मी या आव्हानावर मात करेन आणि पूर्णपणे निरोगी होईल", असं हिना खानने म्हटलं.

कोण आहे हिना खान? 

हिना खान हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील मोठं नाव आहे. 'ये रिश्ता क्या कहलात है'मधील अक्षरा या भूमिकेतून हिना घराघरात पोहोचली. हिना 'कसोटी जिंदगी की -2' या मालिकेत देखील झळकली होती. यामध्ये तिने कमोनिकाची भूमिका केली होती. मात्र काही महिन्यातच तिला ही मालिका सोडावी लागली होती. 

(नक्की वाचा- 53 वर्षांपूर्वी या चित्रपटाने दोन खलनायकांना हिरो बनवलं होतं, प्रदर्शनाच्या काही दिवसांतच झाला होता अभिनेत्रीचा मृत्यू)

हिनाने खतरों के खिलाडी सीजन 8 आणि बिग बॉस 11 मध्ये देखील भाग घेतला होता. याशिवाय नागिन 5 मध्ये देखीन तिने छोटी भूमिका केली होती. हिनाने काही बॉलिवूड सिनेमे आणि वेब सीरिजमध्ये देखील काम केलं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
आजीचा पुष्पा-2च्या रोमँटिक गाण्यावरील धमाकेदार डान्स, लोक म्हणाले - रॉकिंग आजी
अभिनेत्री हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान; सोशल मीडियावर दिली माहिती
vicky-kaushal-on-pregnancy-rumours-of-wife-katrina-kaif
Next Article
कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीवर विकी कौशलनं सोडलं मौन, गुड न्यूजवर म्हणाला...
;