जाहिरात
Story ProgressBack

महाराज सिनेमासाठी अभिनेत्याचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, 5 महिन्यांत घटवले 26 किलो वजन

Jaideep Ahlawat Physical Transformation For Maharaj: मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा मुलगा जुनेद खानने 'महाराज' सिनेमाच्या माध्यमातून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले आहे. जुनेदसह अभिनेता जयदीप अहलावतच्या अभिनयासह त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनचीही जोरदार चर्चा आहे.

Read Time: 2 mins
महाराज सिनेमासाठी अभिनेत्याचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, 5 महिन्यांत  घटवले 26 किलो वजन

Jaideep Ahlawat Physical Transformation For Maharaj: मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा मुलगा जुनेद खानने 'महाराज'सिनेमाद्वारे इंडस्ट्रीमध्ये दमदार पदार्पण केले आहे. सिनेरसिकांकडून जुनेदवर कौतुकाचा-प्रेमाचा वर्षाव होत आहे. जुनेद व्यतिरिक्त अभिनेता जयदीप अहलावतनंही सिनेमामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. दुसरीकडे जयदीप त्याच्या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनमुळेही तुफान चर्चेत आहे. महाराज सिनेमासाठी केलेले जयदीपने जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर त्यानं फोटो-व्हिडीओही शेअर केले आहेत.

(नक्की वाचा: 53 वर्षांपूर्वी या चित्रपटाने दोन खलनायकांना हिरो बनवलं होतं, प्रदर्शनाच्या काही दिवसांतच झाला होता अभिनेत्रीचा मृत्यू)

पाच महिन्यांत 26.7 किलो वजन केले कमी

Before आणि After फोटो शेअर करत त्याने तब्बल 26.7 किलो वजन पाच महिन्यांत घटवल्याची माहितीही चाहत्यांसोबत शेअर केली. या फोटोवर लाइक व कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. चाहते त्याच्या या ट्रान्सफॉर्मेशनचे मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत.  

महाराज सिनेमातील जयदीपची दमदार भूमिका

जयदीपने महाराज सिनेमामध्ये हवेलीतील मुख्य पुजाऱ्याची भूमिका निभावली आहे. या पात्रासाठी त्याने जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केले. इन्स्टाग्रामवर त्याने स्वतःचे 109.7 किलो आणि 83 किलो वजन असतानाचे फोटो शेअर केले. हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये म्हटलंय की, "109.7 किलो पासून ते 83 किलोपर्यंत 5 महिन्यांत🤪🤪. महाराजमधील भूमिकेसाठी ट्रान्सफॉर्मेशन. 😜😜😜@prajwal7542 माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल प्रज्वल सर धन्यवाद"

(नक्की वाचा: अमिताभ आज पण 'सिकंदर' पण फोटोतले 'ते' 3 जण गायब, जाणून घ्या पद्मिनी, राजदूत, चेतकची कहाणी)

या पोस्टवर चाहत्यांनी फायर इमोजी शेअर करत त्याचे कौतुक केले आहे. एका युजरने म्हटलंय की, 'हॅट्स ऑफ'. आणखी एका युजरने लिहिलंय की, अमेझिंग भाई. अभिनेत्री ऋचा चढ्ढाने 'बढिया' अशी कमेंट केली आहे.  

(नक्की वाचा:अभिषेक बच्चननं मुंबईत खरेदी केले 6 फ्लॅट, किंमत वाचून बसेल धक्का)

'महाराज'ला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद

महाराज सिनेमा 21 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. आमिर खानचा मुलगा जुनेद खानच्या अभिनयाचेही कौतुक केले जात आहे. जयदीप अहलावतच्या अभिनयानेही चाहत्यांचे मन जिंकले आहे. यापूर्वी 'जाने जान', 'पाताल लोग', 'ब्लडी ब्रदर्स', 'द ब्रोकन न्यूज', 'बार्ड ऑफ ब्लड' यासारख्या वेब सीरिजमध्येही जयदीपचा दमदार अभिनय पाहायला मिळाला आहे.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
53 वर्षांपूर्वी या चित्रपटाने दोन खलनायकांना हिरो बनवलं होतं, प्रदर्शनाच्या काही दिवसांतच झाला होता अभिनेत्रीचा मृत्यू
महाराज सिनेमासाठी अभिनेत्याचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, 5 महिन्यांत  घटवले 26 किलो वजन
nana-patekar-share memory on-elder-son-durvasa-who-died-at-the-age-of-two-and-a-half-years
Next Article
नाना पाटेकरला मोठ्या मुलाचा का होता तिरस्कार? अडीच वर्षांचा असतानाच झालं निधन
;