जाहिरात

Sunjay Kapur Property : संजय कपूरच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीत करिश्मा कपूरच्या मुलांची नावं का नाही? 

संजय कपूरची पत्नी प्रिया सचदेवने कोर्टात मृत्यूपत्र दाखल केलं. यामध्ये करिश्मा कपूरच्या मुलांची नावं या मृत्यूपत्रात नाहीत.

Sunjay Kapur Property : संजय कपूरच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीत करिश्मा कपूरच्या मुलांची नावं का नाही? 
संजय कपूर प्रॉपर्टी केस प्रिया सचदेव ने फर्जी वसीयत के आरोप का किया खंडन

Sunjay Kapur 30,000 crore estate : संजय कपूर याच्या संपत्तीवरुन सुरू असलेला वाद अद्यापही संपलेला नाही. संजय कपूरची पत्नी प्रिया सचदेवने कोर्टात मृत्यूपत्र दाखल केलं. यामध्ये करिश्मा कपूरच्या मुलांची नावं या मृत्यूपत्रात नाहीत. त्यामुळे करिश्मा कपूरच्या मुलांच्या वकिलांनी हे मृत्यूपत्र खोटं असल्याचा दावा केला आहे. संजय कपूरच्या मृत्यूपत्राबाबत दिल्ली उच्च न्यायालयात नवी माहिती समोर आली आहे. 

करिश्मा कपूरच्या मुलांनी दाखल केलेल्या खटल्यानुसार, ३० हजार कोटींची संपत्ती त्यांच्या तिसऱ्या पत्नीला दिल्याचे कागदपत्र डिजिटल स्वरुपात आहे आणि बनावटी आहे. प्रिया कपूरच्या वकिलांनी याबाबत जोर देऊन सांगितलं की, या प्रकरणात कोणताही कायदेशीर आधार नाही. कारण त्यांनी मृत्यूपत्रला अधिकृतपणे आव्हान दिलं नव्हतं. 

प्रिया सचदेव कपूरचे वकील काय म्हणाले?

वरिष्ठ वकील राजीव नायर यांनी केलेल्या युक्तिवादानुसार, मृत्यूपत्राला कोणीही वैध कायदेशीर आव्हान देऊ शकत नाही आणि आलेल्या तक्रारीत कोणत्याही प्रकारचा वाद नाही. त्यांनी पुढे असंही सांगितलं की, खटला दाखल करण्याच्या एक महिना आधी त्यांना मृत्यूपत्राची माहिती होती. 

नक्की वाचा - Sunjay Kapur: संजय कपूर यांच्या मृत्युपत्रातील She आणि Her चा अर्थ काय? करिश्मा कपूरच्या मुलांचा मोठा आक्षेप

म्हणून संजय कपूरने सर्व संपत्ती माझ्या नावावर केली - प्रिया सचदेव कपूरचे वकील

प्रिया सचदेव यांचे वकील राजीव यांनी सांगितलं की, हे प्रकरण पती विरुद्ध पती असं आहे. यामध्ये वर्तमानात असलेल्या पत्नीला प्राथमिकता दिली जाईल. विभक्त झालेल्या पत्नीला महत्त्व दिलं जाणार नाही. संजय कपूर हे सुट्टीवर होते. ते आपल्या मुलांना संपत्तीपासून वंचित ठेऊ शकत नाही. मात्र त्यांनी करिश्माच्या मुलांना संपत्तीपासून दूर का ठेवलं असेल? माझ्या मते, त्यांना विश्वासाच्या जोरावर स्वत:ची संपत्ती एका व्यक्तीकडे सोपवायची होती. जेव्हा त्याने ट्रस्टकडून शेअर्स घेतले तेव्हा त्यांनी त्यांची आई राणी कपूरसाठी एकही अश्रू ढाळला नाही.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com