जाहिरात

बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असताना अंडरवर्ल्डशी संबंध होते? ममता कुलकर्णीने केला खुलासा

Mamta Kulkarni : 24 वर्षांनंतर बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी भारतात परतली आहे. NDTVशी केलेल्या बातचितदरम्यान तिने मोठे खुलासे केले आहेत.

बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असताना अंडरवर्ल्डशी संबंध होते? ममता कुलकर्णीने केला खुलासा

Mamta Kulkarni : 90च्या दशकात आपल्या सौंदर्याने आणि शानदार अभिनयाने सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी 24 वर्षांनंतर भारतात परतली आहे.  NDTVशी केलेल्या खास संवादादरम्यान ममताने कित्येक मोठमोठे खुलासे केले आहेत.  जाणून घेऊया सविस्तर...

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

  1. आईमुळे अभिनेत्री झाले : ममता कुलकर्णीने सांगितले की, "माझा जन्म एका उद्देशासाठी झाला आहे. माझा जन्म बॉलिवूडसाठी झाला नव्हता. माझी आई लहानपणी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची खूप मोठी चाहती होती. 1950मध्ये माझ्या आईला रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेमध्ये सीतेची भूमिका साकारण्याची संधी चालून आली होती. पण माझ्या वडिलांचा यास नकार होता. त्यांनी आईला परवानगी दिली नाही. त्यावेळेस लोकांचा असा समज होता की जे चांगल्या घरातले नाहीत तेच बॉलिवूडमध्ये जातात. पण माझ्या आईची इच्छा होती की मी अभिनेत्री व्हावे".
  2. एका वर्षात सात हिट सिनेमे दिले : ममताने सांगितले की, "1997मध्ये माझे सात सिनेमे रिलीज झाले होते आणि सर्व सिनेमे हिट ठरले होते. त्या काळात मी कित्येक वर्ल्ड टुर केल्या. तुम्ही करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना अचानक अध्यात्मिक जीवनाकडे वाटचाल करता तेव्हा देव तुम्हाला लोकांमध्ये सापडत नाही. गौतम बुद्धांना देखील सर्व काही सोडून जंगलात जावे लागले आणि अनेक वर्षे एकांतात राहावे लागले".
  3. भविष्यातील योजना काय आहेत? : "आता मी संन्यासी आहे. माझा बॉलिवूड किंवा अन्य कोणत्याही गोष्टीशी संबंध नाही. मी गाणी ऐकते. माझे वय 50 वर्षे आहे. मला अध्यात्मिक जीवन जगायचे आहे. अध्यात्माशी संबंधित चर्चांमध्ये मला सहभागी व्हायचंय. सर्वांना एकत्रित जोडून ठेवायचंय", असेही ममता म्हणाली. 
  4. लग्न करण्याची इच्छा आहे? : लग्न करण्याची इच्छा नसल्याचे ममताने सांगितलंय. मी जर केबीसीमध्ये गेले तर पहिल्या पाच प्रश्नांमध्येच मी हरेन कारण मला आजच्या जगाची माहिती नाहीय.  
  5. ड्रग्स प्रकरणावरील प्रतिक्रिया : "मी बॉलिवूड सोडलंय. लोक म्हणतात ड्रग्स प्रकरणात माझे नाव आले, पण हे सर्व काही खोटे आहे. पैशांसाठी लोक असे वागतात. माझ्याकडे त्यावेळेस 10 सिनेमांची ऑफर होती, तीन घरे होती आणि दोन गाड्या होत्या. मी बॉलिवूडचा त्याग केला. मग मी ड्रग्स प्रकरणामध्ये कशी अडकते? माझ्याकडे यासाठी काही कारणच नव्हते".
  6. विक्की गोस्वामीबाबत काय सांगितले?: विक्की गोस्वामीच्या प्रश्नावर उत्तर देताना ममताने म्हटलं की, 1996मध्ये मी विक्की गोस्वामीला भेटले. दुबईमध्ये विक्की गोस्वामीकडे पूर्ण बॉलिवूड येते. पण मी माझ्या कामाशी काम ठेवून होते. लोक मला भेटण्यासाठी खूप प्रयत्न करत होते. 
  7. विक्की गोस्वामी माझा पती नाही : विक्की गोस्वामी पती नसल्याचेही ममताने स्पष्ट केले. त्याने मला बोलावले होते. तो जेलमध्ये होते आणि त्याच्या सुटकेसाठी मी खूप प्रयत्न केले. त्याची सुटका व्हावी, अशी त्याच्या कुटुंबीयांची इच्छा नव्हती. नंतर तो जेलमधून बाहेर आला. पण मला त्याच्या ड्रग्स व्यवहाराबाबत काहीही माहिती नव्हते."
  8. छोटा राजनला ओळखत नाही : छोटा राजनला जाऊन विचारा की तो ममता कुलकर्णीला ओळखतो का? असाही सवाल अभिनेत्रीनं उपस्थित केला. मी कधीही त्याला फोन केला नाही. बॉलिवूडमध्ये काहीही शक्य आहे. पण मी पैशांसाठी बॉलिवूडमध्ये आले नव्हते. मी पूजा करून शुटिंगसाठी जायचे. शुटिंग यशस्वी व्हावे, यासाठी टिळा लावून जायचे. माझा अंडरवर्ल्डशी काहीही संबंध नव्हता. छोटा राजन कोण आहे मी ओळखत नाही".
  9. अंडरवर्ल्डबाबत काय म्हणाली ममता?: ममताने म्हटले की, त्यावेळेस अंडरवर्ल्डचा प्रभाव होता. पण मी कधीही प्रभावित झाले नाही. सिनेमाचे शुटिंग करून मी सरळ घरी यायचे. 
  10. "पंतप्रधान नरेंद्र मोदी महादेवाचे भक्त आहेत. माझ्यासाठी महादेव पितासमान आहेत. मी मोदीजींमध्ये एक गोष्ट पाहिलीय, त्यांना देशाप्रति खूप प्रेम आहे. ते आपल्या देशासाठी काहीही करू शकतात. उगाचच आम्ही पंतप्रधान मोदींनी मतदान करत नाहीय", असे म्हणत ममताने पंतप्रधान मोदींचे तोंडभर कौतुक केले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com