जाहिरात

MHADA Lottery: म्हाडा लॉटरी अखेरच्या क्षणी लांबणीवर, अर्ज नोंदणी पुढे ढकलली; काय आहे कारण?

MHADA Lottery Postpone : म्हाडाने या 120 घरांच्या विक्रीसंदर्भात नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीनुसार, घरांची सविस्तर माहिती असलेली पुस्तिका आणि अर्ज नोंदणीची लिंक आज, गुरुवारी उपलब्ध होणे अपेक्षित होते.

MHADA Lottery: म्हाडा लॉटरी अखेरच्या क्षणी लांबणीवर, अर्ज नोंदणी पुढे ढकलली; काय आहे कारण?

ऋतिक गणकवार, मुंबई

MHADA Lottery: मुंबईतील घरांचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. म्हाडातर्फे (MHADA) विविध वसाहतींमधील 120 घरांची 'प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर विक्री केली जाणार होती. मात्र, आज 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणारी ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया आता तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

नेमकी अडचण काय?

म्हाडाने या 120 घरांच्या विक्रीसंदर्भात नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीनुसार, घरांची सविस्तर माहिती असलेली पुस्तिका आणि अर्ज नोंदणीची लिंक आज, गुरुवारी उपलब्ध होणे अपेक्षित होते. परंतु, म्हाडाच्या संकेतस्थळावर उद्भवलेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही प्रक्रिया वेळेत सुरू होऊ शकली नाही. परिणामी, म्हाडा प्रशासनाने ही नोंदणी तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

(नक्की वाचा-  Vasai-Virar Mahapalika: वसई-विरारवर 'बविआ'चाच झेंडा! भाजपचा पराभव; अजीव पाटील नवे महापौर)

अर्जदारांची प्रतीक्षा वाढली

जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासूनच मुंबईकरांमध्ये या घरांबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत होती. अनेक अर्जदारांनी सकाळी 11 वाजल्यापासूनच म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर लॉग-इन करण्याचा प्रयत्न केला, मात्र तांत्रिक त्रुटींमुळे कोणालाही अर्ज भरता आले नाहीत. म्हाडा कार्यालयातही यासंदर्भात विचारणा करण्यासाठी अर्जदारांनी गर्दी केली होती.

नवीन वेळापत्रक कधी जाहीर होणार?

म्हाडाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, तांत्रिक अडचणींचे निवारण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सविस्तर माहिती पुस्तिका आणि अर्ज करण्याची नवीन तारीख व वेळ लवकरच म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. अर्जदारांनी अफवांवर विश्वास न ठेवता म्हाडाच्या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

(नक्की वाचा-  Holiday News: 7 फेब्रुवारीला राज्यात सुट्टी जाहीर, कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)

योजनेचे स्वरूप

ही योजना 'प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर आधारित असल्याने, जी व्यक्ती सर्वात आधी ऑनलाइन अर्ज सादर करेल, तिला घर मिळण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच या प्रक्रियेत पारदर्शकता आणि तांत्रिक अचूकता असणे अत्यंत आवश्यक आहे. मुंबईतील विविध मोक्याच्या ठिकाणी ही 120 घरे उपलब्ध असून, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही मोठी संधी आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com