जाहिरात

Video : 'त्यांनी भटक्या कुत्र्याचा जीव घेतला'; मराठी अभिनेत्री ओक्साबोक्शी रडली, न्यायाची केली मागणी

मंजरीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती ढसाढसा रडताना दिसत आहे.

Video : 'त्यांनी भटक्या कुत्र्याचा जीव घेतला'; मराठी अभिनेत्री ओक्साबोक्शी रडली, न्यायाची केली मागणी

Manjari Phadnis Emotional Video : अभिनेत्री मंजरी फडनीस हिला एका भटक्या कुत्र्याच्या मृत्यूमुळे मोठा धक्का बसला आहे. सात वर्षांपासून माइकी नावाचा भटका कुत्रा तिच्याच सोसायटीत राहत होता. मंजरीने सोशल मीडियावर पोस्ट करीत माइकीला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. 

भटक्या कुत्र्याच्या मृत्यूने मंजरीला मोठा धक्का...

मंजरीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती ढसाढसा रडताना दिसत आहे. तिने सांगितलं की, माइकी २०१९-२० पासून आमच्या सोसायटीत राहत होता. त्याला त्याच्या कुटुंबाने सोडून दिलं होतं. हळूहळू तो सोसायटीत राहायला लागला आणि सर्वांचा आवडता बनला. सोसायटीतील लोक त्याला खाऊ द्यायचे, त्याची काळजी घ्यायचे. कुटुंबातील एखाद्या सदस्याप्रमाणे त्याला प्रेम दिलं जात होतं. 

ती पुढे म्हणाली, काही दिवसांपूर्वी अचानक माइकी गायब झाला. बराच काळ तो दिसला नाही, त्यानंतर सोसायटीतील लोक चिंतेत होते. सर्वांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. त्याचे पोस्टर लावण्यात आले. अनेकांना विचारपूस केली. मात्र माइकी कुठेच सापडला नाही. 

नक्की वाचा - IIM मधून शिक्षण, Meta मध्ये नोकरी, तरीही कंपनीत थेट VIP प्रवेश नाही; अमिताभ बच्चन यांच्या नातीला थेट इशारा


माइकी अत्यंत शांत आणि प्रेमळ होता..

मंजरीने व्हिडिओमध्ये म्हटलंय, माइकी अत्यंत शांत आणि प्रेमळ कुत्रा होता. तो कुणालाही त्रास देत नव्हता. एका व्यक्तीने सांगितलं की, माइकीसोबत अत्यंत क्रूरकृत्य करण्यात आलं. तो सोसायटीच्या बेसमेंटजवळ आराम करीत होता, तेव्हा त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता. कोणीतरी त्याच्या डोक्यावर लोखंडी सरळीने हल्ला केला. यानंतर माइकी जखमी झाला. यानंतर त्याला पायऱ्यांपर्यंत खेचत आणण्यात आलं. येथेही त्याला मारहाण करण्यात आली. त्याच्या तोंडातून रक्त येत होतं. गंभीर जखमी झाल्यानंतर माइकीला एका गोणीत भरून नाल्यात फेकून दिलं. आम्ही त्याच्या मृतदेहाचा शोध घेत आहोत. 

मंजरीने केली न्यायाची मागणी...

माइकीच्या हत्येनंतर मंजरी भावुक झाली आहे. शांत आणि कुणालाही त्रास न देणारा भटका कुत्रा सुरक्षित नसल्याचं तिनं म्हटलं आहे. तिने दोषींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. मंजरी फडणीस हिला ‘जाने तू... या जाने ना' या चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली. 'ती ग्रँड मस्ती', 'वॉर्निंग', 'किस किसको प्यार करूं' आणि 'हॉटेल मिलन' यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसली आहे.

  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com