- मुंबई-पुणे मार्गावर बुधवारी रात्री मानखुर्द पुलाजवळ झालेल्या भीषण वाहतूक कोंडीत अनेक प्रवासी अडकले होते
- सोनाली कुलकर्णी तब्बल पाच तास वाहतूक कोंडीत अडकून पडली होती
- तिने मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवर चिंता व्यक्त करत नाराजी व्यक्त केली
मुंबई-पुणे मार्गावर बुधवारी रात्री प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मानखुर्द पुलावर झालेल्या भीषण वाहतूक कोंडीत बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तब्बल 5 तास अडकून पडली होती. या भीषण अनुभवाचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर करत संताप आणि चिंता व्यक्त केली आहे. यामुळे मुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मानखुर्द उड्डाणपुलावर बुधवारी रात्री झालेल्या अभूतपूर्व कोंडीत अनेक जण अडकले होते. त्यात सोनाली ही होती. ती म्हणाली "पुढचा प्रवास तर सोडाच, पण मागे वळायलाही जागा नाही," अशा शब्दांत तिने मुंबईच्या कोलमडलेल्या वाहतूक व्यवस्थेवर बोट ठेवले.
सोनाली कुलकर्णी मुंबईहून पुण्याला जात असताना मानखुर्द पुलाजवळ या मोठ्या जाममध्ये अडकली. तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत असून एकही वाहन जागचे हलत नसल्याचे चित्र होते. "आम्ही गेल्या 5 तासांपासून एकाच ठिकाणी अडकलो आहोत. पुढे किंवा मागे जाण्यासाठी कोणताही रस्ता शिल्लक नाही," असे तिने यावेळी सांगितले. जायचे तर कुठे जायचे असा प्रश्न ही तिने या निमित्ताने केला. या सर्व घटनेचा तिने एक व्हिडीओ ही तयार केली. शिवाय तो सोशल मीडियावर शेअर ही केला.
वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर सोनालीने ट्रॅफिक कंट्रोल टीमशी संपर्क साधला. मात्र त्यांना केवळ संयम राखण्यास सांगण्यात आले. या परिस्थितीवर हतबल होत तिने पोलिसांना मदतीचे आवाहन केले. "आम्ही पूर्णपणे अडकलो आहोत, आमच्यासाठी प्रार्थना करा," असे म्हणतानाच ही परिस्थिती अत्यंत भीतीदायक असल्याचे तिने नमूद केले. पण काल रात्री जे घडलं ते धक्कादायक होतं. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मानखुर्द पुलावरील अनुभव एका थरारा पेक्षा कमी नाही.
मुंबई-पुणे प्रवासात प्रवाशांची होणारी ओढाताण काल रात्री पुन्हा एकदा समोर आली. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मानखुर्द ब्रिजजवळ झालेल्या वाहतूक कोंडीत अडकली. तिने या समस्येला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचा ही फोडली. तिने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. त्यानंतर ट्रॅफिकच्या मुद्द्यावर चर्चा रंगली आहे.