वयाच्या 54 व्या वर्षी पहिल्यांदाच तब्बूने आपल्या 'लेकी'ची ओळख करवून दिली; भरव्यासपीठावर म्हणाली...

तब्बूचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Tabu Daughter: तब्बू नुकतीच अगस्त्य नंदाचा चित्रपट 'इक्कीस'च्या प्रीमियरवर पोहोचली होती. येथे तिने पहिल्यांदा पॅपराजीला आपल्या मुलीचे भेट करून दिली. तुम्ही विचार करीत असाल तब्बू तर सिंगल आहे, तिच्या मुलीबद्दल कधीच ऐकलं नाही. मात्र स्वत: तब्बूने ओळख करू दिली.  

कोण आहे तब्बूची मुलगी?

तब्बूने आपली मुलगी म्हणून फातिमा सना शेख हिची ओळख करून दिली. फातिमाला पाहून तब्बू म्हणाली, ही माझी मुलगी आहे. हे वाचून तुम्हाला कदाचित विचित्र वाटत असेल. मात्र थोडं मागे गेलात तर तुम्हाला यामागील कारण लक्षात येईल. ही बाब १९९७ ची आहे. या वर्षी कमल हसन आणि तब्बूचा एक चित्रपट आला होता. या चित्रपटात ज्या मुलीने तब्बूच्या मुलीची भूमिका साकारली होती तिचं नाव फातिमा सेख. इक्कीसच्या प्रीमियरच्या कार्यक्रमात फातिमाला पाहून तब्बू अचानक म्हणाली, ही माझी मुलगी आहे आणि फातिमाला स्वत:जवळ बोलावून घेतलं. यावेळी तब्बूने सांगितलं, चाची ४२० मध्ये ती मुलगी झाली होती. 

सोशल मीडियावरुन या व्हिडिओवर विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या जात आहे. एका युजरने लिहिलंय, दोघीही आई-लेकीसारख्या दिसत आहेत. दुसरा युजर म्हणतो, फातिमा या व्हिडिओमध्ये लहान मुलीसारखीच दिसतेय. 

Advertisement

नक्की वाचा - 10 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात एन्ट्री, 69 चित्रपटांचं करिअर, सुपरस्टारची एग्झिट; 9 जानेवारीला शेवटचा चित्रपट

तब्बू आणि फातिमा सना शेख वर्फफ्रंटवर काय करत आहेत?

कामाबद्दल सांगायचं झाल्यास, फातिमा सना शेख २०२५ मध्ये तीन चित्रपटांमध्ये झळकली. सर्वात आधी 'मेट्रो इन दिनो' चित्रपट. त्यानंतर नेटफ्लिक्सवर 'आप जैसा कोई'मध्ये दिसली त्यानंतर मनीष मल्होत्राच्या गुस्ताख इश्कमध्येही दिसली. 

Advertisement

तब्बूबद्दल सांगायचं झाल्यास, ती २०२४ मध्ये अजय देवगनसोबत  'औरों में कहा दम था' या चित्रपटात दिसली. यानंतर २०२५ मध्ये तिने फारसं काही केलं नाही. आता २०२६ मध्ये तिच्याकडे बऱ्याच चित्रपटांचं काम आहे. 'भूत बंगला', 'दृश्यम ३' यामध्ये तब्बू प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. 'दृश्यम ३' प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेत आहे. अक्षय खन्ना या चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर आता त्याच्या जागी जयदीप अहलावत पाहायला मिळणार आहे.