Thalapathy Vijay Announces Retirement : दक्षिणेतील सुपरस्टार तलपती विजयने आपल्या जबरदस्त अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. मात्र आता तो चित्रपटसृष्टीतून संन्यास घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. तलपती विजयचा शेवटचा चित्रपट 'जन नायकन' चित्रपटगृहात ९ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्याला शेवटचं मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल, या भावनेने चाहते भावुक झाले आहेत. नुकताच चित्रपटाचा ऑडिओ लॉन्चचा कार्यक्रम पार पडला. ज्यात विजय भावुक झाला होता. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. चित्रपटानंतर आता विजय राजकारणात पूर्णपणे लक्ष केंद्रीत करणार असल्याची माहिती आहे.
जन नायकनमध्ये विजयसोबत कोण-कोण झळकणार?
विजयचा शेवटचा चित्रपट जन नायकनबद्दल सांगायचं झाल्यास, यामध्ये बॉबी देओल, पूजा हेगडे, ममिता बैजू, गौतम वासुदेव मेनन, प्रकाश राज, नारायण आणि प्रियामणि यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. एच विनोद या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
विजय तलपतीने कोणकोणत्या चित्रपटांमध्ये काम केलं?
तलपतीने इंडस्ट्रीवर अनेक वर्ष राज्य केलं. त्याने एकामागून एक दर्जेदार चित्रपट दिले. त्याच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांबद्दल सांगायचं झाल्यास त्यात, लियो (615 कोटी), गोट (460 कोटी) बिगिल (304 कोटी) वारिसु (303 कोटी), मर्सेल (257 कोटी) सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती.
विजय तलपतीचा नेटवर्थ किती?
फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, तलपती विजयचं एकूण नेटवर्थ ४७४ कोटी आहे. चित्रपटातून त्याने मोठी कमाई केली आहे. रिपोर्ट्सनुसार, विजय एका चित्रपटासाठी १३० कोटी ते २०० कोटी आकारतो. याशिवाय त्याने ब्रँड एडोर्समेंटमधून मोठी कमाई केली आहे. थलापती विजय रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक करतो.
विजय थलपतीचं कुटुंब कसं आहे?
तलपथी विजयबद्दल सांगायचं झाल्यास, त्याचं संपूर्ण नाव जोसेफ विजय चंद्रशेखर आहे. त्याची आई शोबा चंद्रशेखर प्ले बँक सिंगर आणि गायिका आहे. अभिनेत्याचे वडील ख्रिश्चन आहेत आणि त्याची आई हिंदू आहे. विजयला विद्या नावाची एक बहीण आहे. विजयने १९९९ मध्ये श्रीलंकेतील तमिळ महिला संगीतासोबत लग्न केलं होतं. त्यांना दोन मुलं आहेत. मुलाचं नाव संजय आणि मुलीचं नाव दिव्या आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
