जाहिरात

थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यात त्रिशा कृष्णने ऐश्वर्याचा लुक कॉपी केला? 26 वर्षांपूर्वीचा फोटो व्हायरल

Trisha Krishnan Saree Look: तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री जोसेफ विजय चंद्रशेखर यांच्या शपथविधी सोहळ्यात अभिनेत्री त्रिशा कृष्णनने आपल्या पारंपरिक लुक कॅरी केला होता. या लुकची आता अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या लुकसोबत तुलना केली जातेय. पण का?

थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यात त्रिशा कृष्णने ऐश्वर्याचा लुक कॉपी केला? 26 वर्षांपूर्वीचा फोटो व्हायरल
"Trisha Krishnan Saree Look: त्रिशा कृष्णनच्या लुकची ऐश्वर्या रायसोबत केली जातेय तुलना"
Social Media

Trisha Krishnan Saree Look: जोसेफ विजय चंद्रशेखर यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून 10 मे 2026 रोजी शपथ घेतली. या खास प्रसंगी अभिनेत्री त्रिशा कृष्णनने सुंदर पारंपरिक लुक कॅरी केला होता. विजय यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी त्रिशाने सिल्क पॅटर्न साडीची निवड केली होती. तिचा हा लुक चाहत्यांना प्रचंड आवडला. Pothis ब्रँडच्या साडीवर तिने कस्टमाइज्ड ब्लाउज मॅच केले होते. साडीवर तिने 'जीआरटी ज्वेलर्स'चे दागिने, गजरा आणि ड्युई मेकअप असा परफेक्ट लुक कॅरी केला होता.  

दरम्यान इंटरनेटवर युजर्स तिच्या या लुकची तुलना ऐश्वर्या रायच्या वर्ष 2000मधील लुकशी करत आहेत. त्यावेळेस ऐश्वर्याने तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भेटीदरम्यान अशाच प्रकारच्या रंगाची साडी नेसली होती, साडीवर सोनेरी रंगांच्या धाग्यांची एम्ब्रॉयडरी दिसतेय. ऐश्वर्याने साडीवर सेंटर पार्टेड अंबाडा हेअर स्टाइल कॅरी केली होती. 

(नक्की वाचा : Trisha Krishnan: थलपती विजय यांच्या शपथविधीनंतर त्रिशा कृष्णनची पहिली खास पोस्ट, प्रेमाचा उल्लेख! शब्दांचा नेमका अर्थ काय?)

त्रिशा कृष्णनचे खास फोटो

ऐश्वर्या आणि त्रिशा - सेम टू सेम

सोशल मीडियावर युजर्सनी दोन्ही अभिनेत्रींचे फोटो 'साइड बाय साइड' शेअर केले आहेत. एका युजरने 'पोन्नियिन सेल्वन ' सिनेमातील त्यांच्या पात्रांची नावे (नंदिनी आणि कुंदवई) घेत पोस्ट शेअर केली. काही युजर्सनी ऐश्वर्याच्या वर्ष 2000 मधील 'कंधुकोंडैन कंधुकोंडैन ' या सिनेमाचे स्क्रीनशॉट्स शेअर करत त्रिशाचा लुक त्यावरून प्रेरित असल्याचे म्हटले.

(नक्की वाचा: Thalapathy Vijay Son: थलपती विजय यांच्या मुलाचे 5 फोटो, वडिलांची आहे कार्बन कॉपी; या भूमिकेत गाजवणार सिनेसृष्टी?)

ऐश्वर्या रायचा 26 वर्षांपूर्वीचा फोटो

दोन्ही अभिनेत्रींचे कनेक्शन 

त्रिशा कृष्णन आणि ऐश्वर्या राय या दोन्ही अभिनेत्री मणिरत्नम यांच्या पोन्नियिन सेल्वन-1 (2022) आणि पोन्नियिन सेल्वन-2 (2023) या सिनेमांमध्ये एकत्र दिसल्या होत्या. काही युजर्सनी चुकून असेही म्हटले की, त्रिशाने ऐश्वर्याच्या 'इरुवर' सिनेमातील साडी नेसली आहे, पण प्रत्यक्षात ते वर्ष 2000 मधील एका वेगळ्या कार्यक्रमातील फोटो होते. त्रिशाचा हा लुक सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून लोक याला 'क्लासिक एलिगन्स'चे उत्तम उदाहरण मानत आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com