VIDEO: अभिनेत्री विशाखा सुभेदारचा मुलगा युद्धभुमीत अडकला! रडत रडत मागितली मदत, '4 दिवसांपासून तो'

अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे तसेच मुलांच्या काळजीने व्याकुळ होत त्यांनी मदतीचे आवाहनही केले आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Marathi Actress Vishakha Subhedar VIDEO:  सध्या अमेरिका- इस्त्राईल इराण युद्धाने जगभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या तिन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या संघर्षामुळे दुबईसह इतर गल्फ देशांवरही हल्ले होत आहेत. या हल्ल्यांमुळे जगभरातील विमान वाहतूक सेवा विस्कळीत झाली असून अनेक भारतीय नागरिक आखाती देशांमध्ये अडकले आहेत. मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगाही कुवैतमध्ये अडकल्याचे समोर आले असून त्यांनी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन केले आहे. 

अभिनेत्री विशाखा सुभेदारचा मुलगा कुवेतमध्ये अडकला 

मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय हा युद्धभुमीत अडकला आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनय सुभेदार हा भारतात आला होता. त्यानंतर तो शिक्षणासाठी पुन्हा लंडनला गेला. मात्र लंडनकडे जात असताना युद्धजन्य परिस्थितीमुळे विमान कुवेतमध्येच उतरलं आणि तो तिथेच अडकला. स्वतः अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे तसेच मुलांच्या काळजीने व्याकुळ होत त्यांनी मदतीचे आवाहनही केले आहे. 

Mumbai ATS Raid: ब्रेकिंग! मुंबईत 4 ठिकाणी ATSची छापेमारी, चौघे ताब्यात; दहशतवादी कनेक्शनचा संशय

या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की, नमस्कार मी विशाखा सुभेदार, माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे, माझा मुलगा लंडनच्या प्रवासाला निघाला होता, मात्र कुवेतमध्ये त्याचं फ्लाईट उतरवण्यात आले. गेली चार एयर स्पेस नसल्याने सगळ्या देशाला माहितेय विमान रद्द करण्यात आली आहेत. माझा मुलगा चार दिवसांपासून कुवैतमध्ये अडकला आहे. आतात तिथली परिस्थिती गंभीर होत चालली आहे, आपण बातम्यांमध्ये पाहतोय, तो स्वतः तिथे अनुभवतोय, अनेक ड्रोन हल्ले होत आहेत.

CM फडणवीस, पंतप्रधानांना केली विनंती! 

तसेच आत्ता एअरलाईनने त्यांची हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे. कुवेतमधील इंडियन अँबेसीने त्यांची सोय केली आहे. त्यांना भारतात आणण्याची व्यवस्था करावी. जसं दुबईमधील लोकांना आणण्यात आले, तशी त्यांनाही आणण्याची व्यवस्था करावी अशी माझी कळकळीची विनंती आहे. अनेक कुटुंबे त्यांची मायदेशी वाटत बघत आहेत, आमच्या मुलांची काळजी घ्यावी, एवढीच विनंती मी करत आहे, कृपया लवकरात लवकर मार्ग काढावा, असंही विशाखा सुभेदार यांनी म्हटलं आहे. 

Advertisement

Israel attacks Iran: बॉलिवूडची अभिनेत्री दुबईत अडकली! PM मोदींकडे विनंती; भयानक परिस्थिती सांगितली