Sonal Chauhan stranded in Dubai: अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून इराणवर हल्ला केला असून मोठा युद्धाचा वणवा पेटला आहे. तिन्ही देशांमध्ये घमासान युद्ध सुरु असून हल्ले- प्रतिहल्ल्यांनी जगभरात खळबळ उडाली आहे. आत्तापर्यंत ८ देशांना या युद्धाची झळ पोहोचली असून आशिया खंडामध्ये युद्धाचे काळे ढग निर्माण झाले आहे. या युद्धाचा फटका दुबईलाही बसला असून अनेक जण दुबईत अडकले आहेत. अशातच बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनल चौहानही दुबईमध्ये अडकली आहे, तिने थेट पंतप्रधान मोदींकडे मदत मागितली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहान दुबईत अडकली
बॉलीवूड अभिनेत्री सोनल चौहान दुबईमध्ये अडकली आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर दुबईला जाणाऱ्या विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. ज्यामुळे अभिनेत्रीला भारतात परत येणे कठीण झाले आहे. याबाबत तिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत देशाचे पंतप्रधान मोदींकडे मदत मागितली आहे.
अभिनेत्रीने भारत सरकार आणि पंतप्रधान मोदींकडून मदतीची विनंती केली आहे. इंस्टाग्रामवर पंतप्रधानांना टॅग करत अभिनेत्रीने लिहिले आहे की, "आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, सध्या सुरू असलेल्या संकटात मी दुबईमध्ये अडकली आहे. विमाने रद्द करण्यात आली आहेत आणि भारतात परतण्याचा कोणताही स्पष्ट मार्ग नाही. मला सुरक्षितपणे घरी परतण्यासाठी मदत करण्यासाठी मी सरकारकडून मार्गदर्शन आणि पाठिंबा मागते. सुरक्षित परतीसाठी सरकारकडून कोणत्याही मदत आणि मार्गदर्शनासाठी मी अत्यंत आभारी राहीन.
बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूही दुबईत
दरम्यान, फक्त सोनल चौहानच नव्हेतर भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि भारतीय बास्केटबॉल संघ देखील दोहामध्ये अडकला आहे. सध्या काय घडत आहे हे समजून घेणे कठीण आहे. हे पाहणे खरोखरच भयानक आहे. इतके त्रासदायक व्हिडिओ समोर येत आहेत आणि दुर्दैवाने जे घडत आहे त्याची ही वास्तविकता आहे. दुबई हे एक शहर आहे जे मला खूप आवडते, एक असे ठिकाण जे नेहमीच सुरक्षित वाटते, ज्यामुळे हा क्षण समजणे आणखी कठीण आहे, असं पीव्ही सिंधूने म्हटलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world