जाहिरात
This Article is From May 29, 2024

दंगल फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन, सोशल मीडियावर शेअर केली भावुक पोस्ट

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या ब्लॉकबस्टर 'दंगल' सिनेमातील अभिनेत्री झायरा वसीमनं सोशल मीडियावर शेअर केलेली भावुक पोस्ट व्हायरल झाली आहे.

दंगल फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन, सोशल मीडियावर शेअर केली भावुक पोस्ट

Zaira Wasim : अभिनय क्षेत्राला कायमचा अलविदा करणारी अभिनेत्री झायरा वसीमच्या वडिलांचे निधन झाले आहे. याबाबतीची माहिती देणारी भावनिक पोस्ट तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या सुपरहिट ठरलेल्या 'दंगल' सिनेमामध्ये झायरा बालकलाकार म्हणून झळकली होती. याव्यतिरिक्त तिने 'सीक्रेट सुपरस्टार' आणि 'द स्काय इज पिंक' यासारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. यानंतर तिने अभिनय जगताला निरोप देण्याचा जाहीर केला होता.  

(नक्की वाचा: दिव्या-अपूर्व हनीमूनहून परतताच सुरु झाली घटस्फोटाची चर्चा, काय आहे कारण?)

झायराने सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटले आहे की, "माझे वडील जाहिद वसीम यांचे निधन झाले आहे. कृपया माझ्या वडिलांसाठी प्रार्थना करा आणि अल्लाहकडे प्रार्थना करा की त्यांच्या चुका माफ करा, त्यांची कबर शांतीपूर्ण बनवा, त्यांना यातनांपासून वाचवा, त्यांचा पुढील प्रवास सुकर करावा आणि त्यांना स्वर्गातील सर्वोच्च स्तर प्रदान करावे"

(नक्की वाचा: मुनव्वर फारूकीनं केलं दुसरं लग्न, पाहा कोण आहे नवी बेगम महजबीन कोटवाला)

झायराची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर चाहते तिचे सांत्वन करत तिच्या वडिलांना श्रद्धांजली वाहताहेत.  

(नक्की वाचा: पायल कपाडियाने कान्समध्ये रचला इतिहास, यापूर्वीही देशासाठी केलीय अशी महत्त्वपूर्ण कामगिरी)

VIDEO: 250 गुन्ह्यांची उकल केली, तपासादरम्यान पोलीस श्वानाचं निधन; कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: