जाहिरात

Viral Video: आडवे पाडले,छाताडावर बसत तुडवले; लाल सिंग चढ्ढावरून टोमणा मारणाऱ्या वीर दासला आमीर खानने झोडपले

वीर दास याच्या छाताडावर बसत आमीरने त्याला मारहाण केली असून हा सगळा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 'एक फिल्म फ्लॉप झाली, तर सगळे माझ्या मागे लागलेत' असं म्हणत आमीरने मारहाण केली.   

Viral Video: आडवे पाडले,छाताडावर बसत तुडवले; लाल सिंग चढ्ढावरून टोमणा मारणाऱ्या वीर दासला आमीर खानने झोडपले
Aamir Khan Talkies YT Channel
मुंबई:

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमीर खानने स्टँड अप कॉमेडियन, अभिनेता वीर दासला मारहाण केलीय. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वीर दास याने आमीर खान याला टोमणा मारला होता. लाल सिंग चढ्ढा फ्लॉप झाल्याचं म्हणत मारलेला टोमणा आमीर खानला आवडला नाही आणि त्याने वीर दास याला मारहाण केली. वीर दास ज्या सोफ्यावर बसला होता, त्या सोफ्यावर त्याला आडवा करत त्याच्या छाताडावर बसत आमीरने त्याला मारहाण केली असून हा सगळा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 'एक फिल्म फ्लॉप झाली, तर सगळे माझ्या मागे लागलेत' असं म्हणत आमीरने मारहाण केली.   

पाहा आमीर खान आणि वीर दास यांच्या हाणामारीचा व्हिडीओ
 

प्रमोशनसाठी मारहाणीचा फंडा

वीर दास याचा नवीन चित्रपट येत असून हॅप्पी पटेल खतरनाक जासूस असं या चित्रपटाचं नाव आहे. वीर दास हाच या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. या चित्रपटात वीर दास यानेच आयटम नंबर केला आहे. चित्रपटात अभिनेत्री वीर दास याच्या कानाखाली मारते आणि या दोन्ही गोष्टी आमीर खान याला आवडलेल्या नाहीत. हा कसला आयटम डान्स आणि हा कसला रोमान्स आहे असा सवालही आमीर खान याने वीर दास याला केला होता. आपण हटके फिल्म बनवलीय असं वीर दास याने म्हटलं पण आमीरला ते काही पचनी पडलं नाही. या चित्रपटात मिथिला पालकर, मोना सिंह या देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात आमीर खान याचीही प्रमुख भूमिका आहे. 16 जानेवारी 2026 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com